शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या विमान अपघाताशी खरातच्या अघोरी प्रथांचा संबंध आहे का? राष्ट्रवादीचा सवाल! "चाकणकरांनी स्वत:चे बोट कापून केली काळी जादू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 07:16 IST

२६ ते ३१ जानेवारीदरम्यानचे कॉल डिटेल्स काढून हा बाबा नेमका कुणाच्या संपर्कात होता, हे समोर आणणे अत्यावश्यक असल्याची मागणीही मिटकरी यांनी केली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताशी भोंदूबाबा खरातचा संबंध असण्याची शक्यता असल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. व्हीएसआर कंपनीच्या विमानासोबत या भोंदूबाबाचे संबंध दिसत असल्याचे सांगत संबंधित विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांन सोबतचा खरात याचा फोटोही व्हायरल झाला आहे. खरात याच्या या संबंधांतून अजितदादा यांना नादुरुस्त विमानात बसण्याचा सल्ला देण्यात आला का, किंवा काही अघोरी प्रथांचा यात संबंध आहे का, याची चौकशी झाली पाहिजे. विषारी वायू वापरण्यात आला का, अशीही शक्यता तपासली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. २६ ते ३१ जानेवारीदरम्यानचे कॉल डिटेल्स काढून हा बाबा नेमका कुणाच्या संपर्कात होता, हे समोर आणणे अत्यावश्यक असल्याची मागणीही मिटकरी यांनी केली आहे.

वादग्रस्त व्हिडीओंची संख्या १००हून अधिक -महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी तब्बल दोन तास खरातची कसून चौकशी केली. खरात याच्याशी संबंधित आणखी अनेक वादग्रस्त व्हिडीओ हाती लागल्याने अशा व्हिडीओची संख्या १०० हून अधिक झाल्याची चर्चा आहे. कॅप्टन खरातचे सेक्स स्कँडलमध्ये सुरुवातीस ५८ व्हिडीओ समोर आल्याचा दावा सुरुवातीपासून करण्यात येत होता. 

‘चाकणकरांनी स्वत:चे बोट कापून केली काळी जादू’ -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी २ सप्टेंबर २०२४ला सोमवती अमावास्येच्या दिवशी स्वत:ची अनामिका (बोट) कापून तंत्र - मंत्र विधी केल्याचे पीडित महिला सांगतात, असा आरोप उद्धवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला. 

खरातांचे वडील वारले, तेव्हा चाकणकर होत्या. खरातांच्या मुलीचं लग्न जमलं, तेव्हा चाकणकर पुढे होत्या. खरातांची भाची चाकणकरांच्या घरीच राहते, अशी माहिती पीडितांनी दिल्याचे सांगून खरातचा सीडीआर तपासला पाहिजे असे त्या म्हणाल्या.

अजित पवारांच्या बंगल्याबाहेर दिसलेल्या जादूटोण्यातील वस्तू -अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर आणि बारामतीतील बंगल्याबाहेर जादूटोण्यातील वस्तू सापडल्या होत्या. हे कृत्य भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती करत होत्या काय? याची चौकशी झाली पाहिजे. सुनील माने, प्रवक्ता, राष्ट्रवादी (शरद पवार) 

कागदपत्रांची छाननी दिवसभर होती सुरू -मिळालेल्या माहितीवर आधारीत कागदपत्रे गोळा करून खरातवरील आरोपांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सहा तासांपेक्षा जास्त वेळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी चालली. 

एका नगरसेविका पतीची चौकशी... -खरात प्रकरणात एसआयटी पथकाने नाशिक येथील एका नगरसेविकेच्या पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्याचे समजते. 

५०० कोटींची संपत्ती -खरातने नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास ३० हून अधिक ठिकाणी प्लॉट खरेदी केल्याचे समोर आले आहे. खरातच्या सर्व जमिनींची किंमत जवळपास ५०० कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे. अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर संपत्ती असल्याचे समजते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's plane accident linked to black magic? NCP demands probe.

Web Summary : NCP alleges Ajit Pawar's plane mishap linked to charlatan Kharat's rituals. Investigation demanded into possible black magic, toxic gas use, and Kharat's contacts. Rupali Chakankar accused of self-harm for rituals. Pawar's bungalow found with suspicious items.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातAjit Pawarअजित पवारRupali Chakankarरुपाली चाकणकरAmol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस