अजित पवारांच्या विमान अपघाताशी खरातच्या अघोरी प्रथांचा संबंध आहे का? राष्ट्रवादीचा सवाल! "चाकणकरांनी स्वत:चे बोट कापून केली काळी जादू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 07:16 IST2026-03-21T07:15:34+5:302026-03-21T07:16:42+5:30

२६ ते ३१ जानेवारीदरम्यानचे कॉल डिटेल्स काढून हा बाबा नेमका कुणाच्या संपर्कात होता, हे समोर आणणे अत्यावश्यक असल्याची मागणीही मिटकरी यांनी केली आहे.

Is there a connection between Ajit Pawar's plane crash and Kharat's Aghori practices? Nationalist question! "Chakankar performed black magic by cutting off his own finger" | अजित पवारांच्या विमान अपघाताशी खरातच्या अघोरी प्रथांचा संबंध आहे का? राष्ट्रवादीचा सवाल! "चाकणकरांनी स्वत:चे बोट कापून केली काळी जादू"

अजित पवारांच्या विमान अपघाताशी खरातच्या अघोरी प्रथांचा संबंध आहे का? राष्ट्रवादीचा सवाल! "चाकणकरांनी स्वत:चे बोट कापून केली काळी जादू"

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताशी भोंदूबाबा खरातचा संबंध असण्याची शक्यता असल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. व्हीएसआर कंपनीच्या विमानासोबत या भोंदूबाबाचे संबंध दिसत असल्याचे सांगत संबंधित विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांन सोबतचा खरात याचा फोटोही व्हायरल झाला आहे. खरात याच्या या संबंधांतून अजितदादा यांना नादुरुस्त विमानात बसण्याचा सल्ला देण्यात आला का, किंवा काही अघोरी प्रथांचा यात संबंध आहे का, याची चौकशी झाली पाहिजे. विषारी वायू वापरण्यात आला का, अशीही शक्यता तपासली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. २६ ते ३१ जानेवारीदरम्यानचे कॉल डिटेल्स काढून हा बाबा नेमका कुणाच्या संपर्कात होता, हे समोर आणणे अत्यावश्यक असल्याची मागणीही मिटकरी यांनी केली आहे.

वादग्रस्त व्हिडीओंची संख्या १००हून अधिक -
महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी तब्बल दोन तास खरातची कसून चौकशी केली. खरात याच्याशी संबंधित आणखी अनेक वादग्रस्त व्हिडीओ हाती लागल्याने अशा व्हिडीओची संख्या १०० हून अधिक झाल्याची चर्चा आहे. कॅप्टन खरातचे सेक्स स्कँडलमध्ये सुरुवातीस ५८ व्हिडीओ समोर आल्याचा दावा सुरुवातीपासून करण्यात येत होता. 

‘चाकणकरांनी स्वत:चे बोट कापून केली काळी जादू’ -
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी २ सप्टेंबर २०२४ला सोमवती अमावास्येच्या दिवशी स्वत:ची अनामिका (बोट) कापून तंत्र - मंत्र विधी केल्याचे पीडित महिला सांगतात, असा आरोप उद्धवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला. 

खरातांचे वडील वारले, तेव्हा चाकणकर होत्या. खरातांच्या मुलीचं लग्न जमलं, तेव्हा चाकणकर पुढे होत्या. खरातांची भाची चाकणकरांच्या घरीच राहते, अशी माहिती पीडितांनी दिल्याचे सांगून खरातचा सीडीआर तपासला पाहिजे असे त्या म्हणाल्या.

अजित पवारांच्या बंगल्याबाहेर दिसलेल्या जादूटोण्यातील वस्तू -
अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर आणि बारामतीतील बंगल्याबाहेर जादूटोण्यातील वस्तू सापडल्या होत्या. हे कृत्य भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती करत होत्या काय? याची चौकशी झाली पाहिजे. 
सुनील माने, प्रवक्ता, राष्ट्रवादी (शरद पवार) 

कागदपत्रांची छाननी दिवसभर होती सुरू -
मिळालेल्या माहितीवर आधारीत कागदपत्रे गोळा करून खरातवरील आरोपांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सहा तासांपेक्षा जास्त वेळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी चालली. 

एका नगरसेविका पतीची चौकशी... -
खरात प्रकरणात एसआयटी पथकाने नाशिक येथील एका नगरसेविकेच्या पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्याचे समजते. 

५०० कोटींची संपत्ती -
खरातने नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास ३० हून अधिक ठिकाणी प्लॉट खरेदी केल्याचे समोर आले आहे. खरातच्या सर्व जमिनींची किंमत जवळपास ५०० कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे. अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर संपत्ती असल्याचे समजते.

Web Title : अजित पवार के विमान हादसे का काला जादू से संबंध? NCP ने की जांच की मांग।

Web Summary : एनसीपी का आरोप, अजित पवार के विमान हादसे का संबंध ढोंगी खराट के अनुष्ठानों से है। संभावित काले जादू, जहरीली गैस के उपयोग और खराट के संपर्कों की जांच की मांग। रूपाली चाकणकर पर अनुष्ठानों के लिए आत्म-हानि का आरोप। पवार के बंगले में संदिग्ध वस्तुएं मिलीं।

Web Title : Ajit Pawar's plane accident linked to black magic? NCP demands probe.

Web Summary : NCP alleges Ajit Pawar's plane mishap linked to charlatan Kharat's rituals. Investigation demanded into possible black magic, toxic gas use, and Kharat's contacts. Rupali Chakankar accused of self-harm for rituals. Pawar's bungalow found with suspicious items.