सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 19:38 IST2025-05-14T19:36:17+5:302025-05-14T19:38:24+5:30

Students Safety: महाराष्ट्र सरकारने लहान मुलांचं लैंगिक शोषण थांबवण्यासाठी राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली.

Install CCTV, conduct alcohol test on bus drivers and...; State government's new guidelines for schools | सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली

सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली

महाराष्ट्र सरकारने लहान मुलांचं लैंगिक शोषण थांबवण्यासाठी राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार, राज्यातील प्रत्येक शाळांत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे अनिवार्य असेल. याशिवाय, मुलांसाठी सत्रांचे आयोजन करणे, शालेय कर्मचाऱ्यांची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आली. नियमांचे पालन न केल्यास सरकारी अनुदान रोखणे किंवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारखी कारवाई केली जाऊ शकते.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील एका नामांकीत शाळेतील दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात झाला. या पार्श्वभूमीवर शाळांमधील सुरक्षा वाढवण्यासाठी हे नवीन नियम बनवण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १३ मे २०२५ रोजी एक जीआर जारी केला. त्यानुसार, १८ वर्षांखालील प्रत्येक व्यक्तीला अल्पवयीन मानले जाईल.शाळेत कोणताही गुन्हा घडल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना किंवा बाल कल्याण पोलीस विभागला देणे बंधनकारक आहे. 

राज्य सरकारची नियमावली
- सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य आहे, कॅमेऱ्यांचे फुटेज किमान एक महिना जपून ठेवणे बंधनकारक.
- शक्य असल्यास पूर्व-प्राथमिक ते इयत्ता सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला शिक्षकांची नियुक्ती करा.
- शालेय कर्मचाऱ्यांची कसून तपासणी करा, आवश्यक असल्यास चारित्र्य प्रमाणपत्र घ्या.
-  बसचालकासह इतर कर्मचाऱ्यांची नियमितपणे अल्कोहल चाचणी करणे आवश्यक आहे.
- प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला कर्मचारी असणे अनिवार्य आहे
- शाळेच्या आवारात १०९८ हा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक भागात लावावा. 
- मुले शाळेत गैरहजर असतील, तर मेसेजद्वारे त्यांच्या पालकांना सूचना द्यावी.
- मानसिक दबावाखाली असलेल्या किंवा त्रासलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करावे.
- लहान मुलांना 'गुड टच' आणि 'बॅड टच' बद्दल माहिती द्यावी.

Web Title: Install CCTV, conduct alcohol test on bus drivers and...; State government's new guidelines for schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.