शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलेसह नवजात अर्भकाचा मृत्यू

By admin | Updated: December 6, 2015 01:58 IST

शहापूर उपजिल्हा रु ग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शहापुरातील आदिवासी महिलेसह तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना २८ नोव्हेंबरला रात्री घडली.

आसनगाव : शहापूर उपजिल्हा रु ग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शहापुरातील आदिवासी महिलेसह तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना २८ नोव्हेंबरला रात्री घडली. त्या आदिवासी महिलेचा पती सुनील हिलम याने संबंधित डॉक्टरांवर कारवाईसाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे . वाफे येथे राहणाऱ्या सुनील गणपत हिलम यांची पत्नी सुनीता यांच्या पोटात २८ नोव्हेंबरला अचानक दुखायला लागले म्हणून तिच्या नातेवाइकांनी रात्री ९ च्या सुमारास रु ग्णालयात दाखल केले. त्या वेळी ११ महिन्यांच्या ट्रेनिंग बेसवर काम करणाऱ्या डॉ. सुवर्णा कोवे या हजर होत्या. त्यांनी तपासणी करून तिला प्रसूती येण्यासाठी इंजेक्शन दिले. बाळंतपणाची प्रक्रि या सुरू झाल्यावर लहान बाळ पायाच्या बाजूने बाहेर आल्याने गर्भ पिशवीत अडकले. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्या नातेवाइकांना सुनीताला दुसऱ्या रुग्णालयास नेण्यास सांगितले. पुढे तिला ठाणे येथील जिल्हा रु ग्णालयात नेले असता तेथेही न घेता तिला मुंबई येथील केईएम रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरू केले, परंतु सकाळी ८ च्या सुमारास आई व त्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार शहापूर उपजिल्हा रु ग्णालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे सांगून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुनील हिलम यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. सदर महिलेच्या प्रसूतीत अडचणी असल्याचे आमच्या डॉक्टरांनी ८ दिवस आधीच पेशंटला सांगितले होते. २८ च्या रात्रीदेखील त्यांना प्रसूती होणे येथे शक्य नाही, असे सांगितले होते. तरीही, सुनील हिलम यांनी आमच्याकडे लेखी लिहून दिले की, काही झाल्यास त्याची जबाबदारी माझी असेल. त्यानंतर, आमच्या डॉक्टरांनी प्रयत्न करूनदेखील प्रसूती अशक्य वाटल्याने त्यांना पुढे पाठविण्यात आले.- डॉ. सुधाकर शिंदे, अधीक्षक, शहापूर उपजिल्हा रु ग्णालय