शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

मुंबईत 27 जानेवारीला येणार चालकविरहित स्वदेशी मेट्रो, स्थानक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 3:48 AM

बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी भेट दिली. त्यांनी सांगितले की, एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका व स्टेशन्स उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

मुंबई :  मेट्रो २ अ आणि ७ या मार्गांवर चालकविरहित स्वदेशी बनावटीच्या मेट्रो चालविल्या जाणार आहेत. २७ जानेवारीला त्या मुंबईत दाखल होतील. २२ जानेवारी रोजी पहिली मेट्रो बंगळुरू येथून मुंबईच्या दिशेने रवाना हाेईल. मेट्रो चारकोप कारशेडमध्ये दाखल झाल्यानंतर तपासण्या करून पुढील दोन महिन्यांत मेट्रोच्या ट्रायल रन्स सुरू होतील. मे महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी भेट दिली. त्यांनी सांगितले की, एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका व स्टेशन्स उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या निर्मितीचे काम भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडकडे सोपविले आहे. सात वर्षांनंतर मुंबई नवीन मेट्रोच्या स्वागतासाठी सज्ज आहे. मेट्रोचे कोच एसी आहेत. स्वयंचलित दरवाजे आहेत. पॅसेंजर अनाउंसमेंट आणि पॅसेंजर इन्फर्मेशन व्यवस्था कार्यरत आहे. प्रत्येक डब्यात फायर फायटिंग यंत्रणा तसेच सीसीटीव्हीची नजर असेल. प्रवाशांना मदतीसाठी प्रत्येक डब्यात एक स्वीच आहे.मेट्राेच्या डब्यात सायकल ठेवण्याची व्यवस्था -मेट्रोच्या प्रत्येक डब्यात दोन सायकली ठेवण्याची व्यवस्था आहे. अपंग बांधवांना व्हीलचेअरसह प्रवास करता यावा यासाठी प्रत्येक डब्यात विशेष साेय उपलब्ध आहे.

अशी असेल नवी मेट्रो- मेट्राेची कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रतितास.- स्वयंचलित पद्धतीने धावणार.- वेग नियंत्रण व सुरक्षेसाठी व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी.- इंटरनेटच्या वापरासाठी प्रत्येक डब्यात ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क.- ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य, पर्यायी अपारंपरिक ऊर्जेचा वापर.

एका मेट्राेची प्रवासी क्षमता २२८० - - ३७८ कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होतील.- प्रत्येक ट्रेन ६ कोचची, प्रत्येक कोचमध्ये ५२ प्रवाशांची आणि ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था.- एका मेट्राेची प्रवासी क्षमता २,२८० तर, डब्यात ३८० जणांचा प्रवास शक्य.- प्रत्येक कोचसाठी सरासरी ८ कोटी रुपये खर्च. आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोचच्या निर्मितीसाठी येताे सरासरी १० कोटी खर्चत.- एकूण कोचची संख्या ५७६ पर्यंत वाढणार- पहिल्या सहा ट्रेन येत्या सहा महिन्यांत दाखल- त्यानंतर दर महिन्याला तीन याप्रमाणे उर्वरित ट्रेन पुढल्या तीन वर्षांत येणार.

३४० किमी लांबीचे मेट्रो जाळे विस्तारणार -पाच वर्षांत मंबई महानगर क्षेत्रात जवळपास ३४० किमी लांबीचे मेट्रो जाळे विस्तारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. लोकलला सक्षम पर्याय मिळेल. कोरोनामुळे कामांचा वेग मंदावला होता. मात्र, आता ही कामे पुन्हा जोमाने सुरू झाली आहेत.- एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

टॅग्स :Metroमेट्रोMumbaiमुंबईrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे