वाशिम : लहान वयातही हृदयविकार, हर्निया, अपेंडिक्ससारखे आजार आढळत असल्याचे चित्र राज्यातील तपासणी मोहिमेतून समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ८ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या मोहिमेत राज्यातील ३८१ बालकांवर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या.
अंगणवाडीपासून ते उच्च माध्यमिक शाळांपर्यंतच्या मुला-मुलींची मोफत आरोग्य तपासणी करून आजारांचे लवकर निदान व गरज भासल्यास शस्त्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो. राज्यात ८ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १८ वर्षांखालील मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून बाब समोर
१८ वर्षाखालील मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया
३३३४ - २०२३-२४
३१५८ - २०२४-२५
१६९५ - २०२५-२६
एकूण २२,५३९ शस्त्रक्रिया
१८ वर्षांखालील मुला-मुलींमध्ये हर्निया, दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट लिप), जन्माच्या वेळी इतर दोष, तिरळेपणा यांसह अन्य आजारही आढळून आले. राज्यात ८ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत हर्निया, क्लेफ्ट लिप यांसह इतर २२,५३९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
जन्मजात हृदयविकार अनेकदा लक्षात येत नाहीत. त्यामुळे लहान वयातच नियमित तपासणी आवश्यक आहे. डॉ. नागेश शिरसाट,हृदयरोगतज्ज्ञ, वाशिम