शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

लठ्ठपणा ठरतोय '' पीसीओडी'' ला कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 6:00 AM

मासिकपाळीची अनियमितता, चेह-यावर ,पायावर केसांची अतिरिक्त वाढ, मासिक पाळीदरम्यान होणारी वेदना ही पीसीओडीची लक्षणे असली तरी ’ स्थूलता’ देखील पीसीओडीला कारणीभूत ठरत आहे...

ठळक मुद्देबदलती जीवनशैली, जंक फूड, व्यायामाचा अभाव, अनुवंशिकता ही  पीसीओडी‘ ची प्रमुख लक्षणे

प्रसंग  : दोघी हॉस्टेलमध्ये राहात होत्या. अचानक तिच्या मैत्रिणीला रक्तस्त्राव सुरू झाला. खरतर तिची मासिक पाळी संपून फक्त दहा दिवसच उलटून गेले होते. पुन्हा रक्तस्त्राव म्हटल्यावर दोघीही घाबरल्या.  कुणाला सांगायचे, असा प्रश्न त्यांना पडला. तिने तिच्या बहिणीला फोन करून मैत्रिणीची कहाणी सांगितली आणि तिला तत्काळ स्त्रीरोगतज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांकडे गेल्यानंतर तिला ‘पीसीओडी’असल्याचे सांगण्यात आले.वैद्यकीय शिक्षण घेत असताना माझे वजन हे 50 किलो होते.  परंतु मानसिक ताण, अभ्यासासाठी करावे लागणारे जागरण यामुळे काही काळातच वजन वाढू लागले. आणि ते काही केल्या कमी व्हायला तयार नव्हते. स्त्रीरोगतज्ञांकडे गेल्यावर पीसीओडीचे निदान झाले- तरूणी

पुणे : सध्याच्या काळात दहा मागे आठ तरी महिलांना ’पोलिएस्टीक ओव्हेरिअन डिसीज’ (पीसीओडी)’ला  सामोरे जावे लागत आहे. विशेषत: 20 ते 25 वर्षे वयोगटातील तरूणींमध्ये पीसीओडीचे वाढते प्रमाण चिंतेचे कारण ठरत असून, अद्यापही याविषयी अनेक तरूणी अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. मासिकपाळीची अनियमितता, चेह-यावर ,पायावर केसांची अतिरिक्त वाढ, मासिक पाळीदरम्यान होणारी वेदना ही पीसीओडीची लक्षणे असली तरी ’ स्थूलता’ देखील पीसीओडीला कारणीभूत ठरत आहे.  यावर वेळीच उपचार न केल्यास भविष्यात गर्भाशयाशी निगडित त्रास संभावण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. कुटुंबामध्ये ’पोलिएस्टीक ओव्हेरिअन डिसीज’ (पीसीओडी) हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो. मात्र नक्की काय? याची कुणालाच अगदी तरूणींनाही फारशी नाही. पीसीओडीमध्ये स्त्रियांच्या अंडाशयात गाठी होतात आणि वेळोवेळी स्त्रीबीज निर्माण होण्यास अडथळे निर्माण होतात. यामुळे महिलांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. मासिकपाळीत एका महिन्याला एकच स्त्रीबीज तयार होते. मात्र पीसीओडीमध्ये हार्मोन्सच्या असंतुलतेमुळे गर्भाशयात अधिक स्रीबीज तयार होतात. त्यामुळे गर्भाशयात अधिक अंडी दिसतात. यामध्ये ओव्ह्युलेशन न झाल्यामुळे मासिकपाळी येतच नाही. गोळ्या घेऊन पाळी सुरू करावी लागते. पीसीओडीचे प्रमाण महिलांमध्ये अधिक असले तरी सध्या 15 ते 20 टक्के तरूणींंमध्ये पीसीओडीची समस्या जाणवत असल्याची माहिती प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ व इन्फर्टिलीटी सल्लागार डॉ. स्वाती गायकवाड यांनी दिली.     त्या म्हणाल्या, बदलती जीवनशैली, जंक फूड, व्यायामाचा अभाव, अनुवंशिकता ही  पीसीओडी‘ ची प्रमुख लक्षणे असली तरीही स्थूलता’ हे देखील एक प्रमुख कारण ठरत आहे. लहानपणापासून मुलींच्या स्थूल प्रकृतीकडे पालकांकडून लक्ष दिले जात नाही. त्यांना चांगली जीवनशैली देणे पालकांचे कर्तव्य आहे. वय जसे वाढत तसे पीसीओडीची लक्षणे स्थूल मुलींमध्ये अधिक दिसू लागतात. ओटीपोटाच्या खालच्या बाजूस असलेली वाढती चरबी हे देखील चिंतेचे कारण ठरू शकते. एकवीस दिवसांमध्ये महिलांची मासिक पाळी येत असेल तर आणि ती चार ते पाच दिवस राहात असेल तर ते नॉर्मल आहे. मात्र पीसीओडीमध्ये मासिकपाळी पुढे ढकली जाते. पस्तीस दिवसांपेक्षा जास्त दिवस पाळी पुढे ढकलली गेली तर त्यांनी स्त्रीरोगतज्ञांकडे जाऊन तपासणी करावी. -------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWomenमहिला