Badlapur Rain: बदलापूर रेल्वे स्थानकावर छप्पर नाही; प्रवाशांचे हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 09:51 IST2025-06-19T09:49:26+5:302025-06-19T09:51:37+5:30

Badlapur Rain: बदलापूर रेल्वे स्थानकातील अनेक ठिकाणी शेड नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट फलाटावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांवर पडत आहे.

Incomplete roof at Badlapur railway station platform No. 3 poses risk for passengers | Badlapur Rain: बदलापूर रेल्वे स्थानकावर छप्पर नाही; प्रवाशांचे हाल!

Badlapur Rain: बदलापूर रेल्वे स्थानकावर छप्पर नाही; प्रवाशांचे हाल!

लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर: बदलापूररेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर सुरू असलेल्या विकासकामांचा फटका पावसाळ्यात प्रवाशांना बसत आहे. पादचारी पुलाच्या कामासाठी स्थानकातील शेड काढल्यामुळे प्रवाशांना एकतर पावसात भिजावे लागते किंवा छत्र्या सांभाळत लोकल पकडण्याची कसरत करावी लागत आहे. दोन वर्षांपासून बदलापूर स्थानकात विकासकामे सुरू आहेत. नवीन, विस्तीर्ण पादचारी पूल उभारले जात आहेत. मात्र, कामाची गती संथ असल्यामुळे काम पूर्ण करण्यास विलंब होत आहे. बदलापूर स्थानकात निम्म्या प्लॅटफॉर्मवर पत्र्याची शेड नसल्यामुळे प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी कसरत करावी लागते.

तात्पुरत्या शेडची गरज 
-भरपावसात प्रवाशांना छत्री घेऊन उभे राहावे लागते आणि लोकल आल्यावर छत्री बंद करून लोकलमध्ये चढण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कामाची गती पाहता आता रेल्वेने ठेकेदाराला काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबरची मुदत दिली आहे.
-बदलापूर स्थानकात फलाट क्रमांक तीनवर पादचारी पुलाच्या पिलरचे काम सुरू  आहे. तसेच तेथे सरकते जिने बसवले जाणार आहेत. त्यामुळे स्थानकावरील पत्र्याची शेड काढण्यात आली. 
-पावसाळ्यात तरी तात्पुरती शेड उभारणी करणे गरजेचे आहे. प्लॅटफॉर्मवर कामे सुरू असल्यामुळे खड्डे पडले आहेत.पावसाचे पाणी साचून प्रवासी पडण्याचा धोका निर्माण झाला. 

होम प्लॅटफॉर्मची अडचण
स्थानकात पादचारी पुलासाठी जो खड्डा खोदला आहे त्यातली माती स्थानकात पसरली आहे. या मातीत पाय घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. होम प्लॅटफॉर्ममुळे बदलापूर स्थानकात आलेली लोकल ही प्रवाशांना दोन्ही बाजूला उतरण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, फलाट क्रमांक एक प्रवाशांसाठी बंद केल्याने आता होम प्लॅटफॉर्मवरच प्रवाशांना उतरावे लागते.

स्टेशन मॅनेजर काय म्हणाल्या? 
रेल्वे प्लॅटफॉर्मवर छत नसल्याबाबतची आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाला देण्यात आली आहे, अशी माहिती स्टेशन मॅनेजर धनश्री गोडे यांनी दिली.

Web Title: Incomplete roof at Badlapur railway station platform No. 3 poses risk for passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.