शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
2
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
3
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

डॅशिंग अधिकाऱ्याची प्रत्येक ठिकाणी छाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 5:03 AM

चॉर्टर्ड अकाउंटंटची (सीए) पहिल्या श्रेणीतील पदवी असतानाही मुद्दामहून आयपीएस सेवेत दाखल झालेल्या हिमांशू रॉय यांच्या तीन दशकांच्या धवल कारर्किदीचा शेवट पोलीस वर्तुळाला चटका लावणारा ठरला.

जमीर काझीमुंबई : चॉर्टर्ड अकाउंटंटची (सीए) पहिल्या श्रेणीतील पदवी असतानाही मुद्दामहून आयपीएस सेवेत दाखल झालेल्या हिमांशू रॉय यांच्या तीन दशकांच्या धवल कारर्किदीचा शेवट पोलीस वर्तुळाला चटका लावणारा ठरला. परिवेक्षणार्थी अधीक्षकापासून ते दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुख पदापर्यंतच्या प्रत्येक पोस्टिंगवर त्यांनी स्वत:ची आगळी छाप निर्माण केली. मात्र हा जिंदादिल अधिकारी कर्करोगाची लढाई लढण्यात अपयशी ठरला.२३ जून १९६३ रोजी जन्मलेल्या हिमांशू रॉय यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर सीएची परीक्षा ते पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. मात्र पोलीस दलाचे आकर्षण असल्याने त्यांनी केंद्रीय स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित केले आणि ते १९८८च्या आयपीएस बॅचचे अधिकारी बनले. सहा फुटांहूनही अधिक उंची व त्याला साजेशी शरीरयष्टी असलेल्या हिमांशू यांचे व्यक्तिमत्त्व चित्रपटातील नायकासारखेच होते. पहिल्या भेटीतच त्यांची समोरच्यावर छाप पडत असे. गडचिरोलीनंतर नाशिक ग्रामीण, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम करीत असताना तेथील संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढली होती. त्यानंतर त्यांनी मुंबईत परिमंडळ-१ व ८चे उपायुक्त म्हणून काम पाहिले. आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेत उपायुक्त असताना अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आणले. २००४ ते २००७ या कालावधीत नाशिकचे आयुक्त म्हणून काम करताना त्यांना वैयक्तिक आरोपांनाही सामोरे जावे लागले. मात्र त्याचा कामावर काहीही परिणाम त्यांनी होऊ दिला नाही. तेथून मुंबई पोलीस दलात कायदा व सुव्यवस्थेच्या पदावर त्यांना बढती मिळाली. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. महानगरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत पार पाडल्यानंतर त्यांच्यावर ‘क्राइम’ची जबाबदारी सोपविली. या शाखेचे तत्कालीन प्रमुख राकेश मारिया यांनी आगळा ठसा उमटविल्याने रॉय यांना स्वतंत्र ओळख निर्माण करणे आव्हानात्मक होते. घटनेचा सर्व दृष्टीने विचार करणे, गुन्ह्यांतील बारकावे आणि तत्काळ निर्णय घेण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांनी ‘क्राइम’मध्ये तोडीस तोडअसे काम करून दाखविले. एटीएसचे प्रमुख म्हणूनही त्यांनी दीड वर्ष जबाबदारी सांभाळली. चार वर्षांपूर्वी त्यांचा कर्करोग बळावला. त्यामुळे तुलनेत साईड पोस्टिंग समजल्या जाणाºया पोलीस गृहनिर्माण व कल्याण विभाग तसेच मुख्यालयात नियुक्ती घेतली. मात्र उपचारासाठी परदेशात जावे लागत असल्याने ते नोव्हेंबर २०१६पासून आजारपणाच्या रजेवर गेले.

टॅग्स :Himanshu Royहिमांशू रॉय