महिला आरक्षण तत्काळ लागू करा, मात्र... : उद्धव ठाकरे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 08:15 IST2026-04-17T08:07:25+5:302026-04-17T08:15:40+5:30
Women's Reservation: संसदेत २०२३ साली मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकानुसार ३३ टक्के आरक्षण तत्काळ लागू करा. मात्र, मतदारसंघ पुनर्रचना थांबवा, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

महिला आरक्षण तत्काळ लागू करा, मात्र... : उद्धव ठाकरे यांची मागणी
मुंबई - संसदेत २०२३ साली मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकानुसार ३३ टक्के आरक्षण तत्काळ लागू करा. मात्र, मतदारसंघ पुनर्रचना थांबवा, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
नारी शक्ती वंदन अधिनियम व मतदारसंघ पुनर्रचना या दोन महत्त्वाच्या विधेयकांसाठी केंद्र सरकारने तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला ठाकरेंनी ऑनलाइन उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी निवेदनाद्वारे पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. संसदेत २०२३ साली महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. त्यानुसार ३३ टक्के महिला आरक्षण तत्काळ लागू करा.
मात्र, मतदारसंघ पुनर्रचना विषयाला तूर्तास ब्रेक लागला पाहिजे. हा व्यापक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. आमच्यासाठी हा एखाद्या पक्षाच्या राजकीय
भविष्याचा विषय नाही; तर देशाच्या भविष्याचा विषय आहे. त्यामुळे त्यावर अधिक चर्चा व संशोधन होणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे.