मी कधीही सहज बोलत नाही - शरद पवार

By Admin | Updated: July 3, 2016 02:15 IST2016-07-03T02:15:41+5:302016-07-03T02:15:41+5:30

छत्रपती अन् पेशवे प्रश्न आता संपलेला आहे़,असे म्हणतमी कधीही सहज बोलत नसतो तर विचार करून बोलतो, अशी टिपण्णी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी येथे केली़

I'm never talking easily - Sharad Pawar | मी कधीही सहज बोलत नाही - शरद पवार

मी कधीही सहज बोलत नाही - शरद पवार

बार्शी : छत्रपती अन् पेशवे प्रश्न आता संपलेला आहे़,असे म्हणतमी कधीही सहज बोलत नसतो तर विचार करून बोलतो, अशी टिपण्णी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी येथे केली़
आ़ दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचीही टीका केली. अंतर्गत वाद असला तरी भाजप, शिवसेना सत्ता सोडणार नाहीत, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मुंबईतील डॉ़ आंबेडकर भवनाच्या ट्रस्टचे प्रमुख रत्नाकर गायकवाड हे राज्याचे मुख्य सचिव होते़ त्यांना कायदे, नियम, प्रशासन या सर्व बाबींची माहिती आहे. तरीही प्रकाश आंबेडकरांसह सर्वजण तक्रारी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या तक्रारीत तथ्य आहे असे वाटते. (प्रतिनिधी)

आंबेडकर भवनाचा प्रश्न भावनेचा
मुंबईतील डॉ़ आंबेडकर भवनाचा प्रश्न लोकांच्या भावनेशी निगडीत आहे, त्यामुळे सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून एकंदरीत वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.

Web Title: I'm never talking easily - Sharad Pawar