शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

'आयसिसचे इंटरनेटवरील प्रभावी अस्तित्व धोकादायक'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 1:56 AM

‘एक्स्प्लोझिव्ह डिटेक्शन’ यावर राष्ट्रीय कार्यशाळा

पुणे : दहशतवादाचे स्वरूप आज बदलत आहे. दहशत पसरविण्यासाठी इंटरनेटचा प्रभावी वापर केला जात आहे. कट्टरतावाद तसेच धार्मिकतेचा प्रसार इंटरनेटद्वारे केला जात आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेचे जमिनीवरील अस्तित्व आज संपुष्टात येत आहे. मात्र, इंटरनेटवर आजही त्यांचे मोठे अस्तित्व आहे. त्यांचे हे वाढते अस्तित्व चिंताजनक आहे, असे प्रतिपादन राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी केले.राष्ट्रीय रक्षा अनुसंधान संस्थेच्या (डीआरडीओ) अतिउच्च पदार्थविज्ञान संस्था (एचईएमआरएल) या प्रयोगशाळेतर्फे ‘एक्स्प्लोझिव्ह डिटेक्शन’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कुलकर्णी बोलत होते.याप्रसंगी एचईएमआरएलचे डायरेक्टर के. पी. एस. मूर्ती, आर्मड अ‍ॅन्ड कॉबेक्ट इंजिनिअरिंगचे प्रमुख डॉ. पी. के. मेहता, भोपाळ येथील आयसर संस्थेचे संचालक डॉ. उमापती, एआरडीएचे प्रमुख डॉ. रमण, लष्करी अभियांत्रिकी विद्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यूज उपस्थित होते.कुलकर्णी म्हणाले, की १९९३ पासून देशात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. यात महाराष्ट्र सर्वाधिक होरपळला आहे. गेल्या दशकात पुण्यात तीन वेळा बॉम्बस्फोट झाले आहेत. दहशतवादी हल्ले होण्याआधीच ते थांबविणे हे सुरक्षा यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. दहशतवाद्यांतर्फे दहशत पसरविण्यासाठी विविध प्रकारच्या स्फोटकांचा वापर केला जातो. या स्फोटकांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. या स्फोटकांचा शोध घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधणे गरजेचे आहे. या चर्चासत्रातून या प्रकारच्या संशोधनावर चर्चा होईल. स्फोटके बनविण्याची माहिती इंटरनेटवर सहजासहजी उपलब्ध आहे. याचा वापर करून स्फोटके बनविली जात आहेत. अशा दहशतवाद्यांना थांबविणे, तसेच त्यांचा शोध घेणे आव्हानात्मक काम आहे.दहशतवादी संघटनांकडून प्रेरित झालेल्यांचा शोघ घेणे मोठे आव्हान दहशतवादाचा चेहरा आज बदलला आहे. इंटरनेटच्या प्रभावी वापरामुळे कट्टरपंथीय आपले विचार पसरवीत आहेत. या विचारांनी अनेक तरुण प्रभावित होत आहेत. कुठल्याही संघटनेशी संबंध न ठेवता ते स्वयंप्रेरणेने दहशतवादी कारवाया करीत आहेत. यामुळे त्यांचा शोध घेणे सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. फ्रान्समध्ये याचे प्रमाण जास्त आहे. येत्या काळात भारतातही अशा कारवाया होण्याची शक्यता आहे, असेही कुलकर्णी म्हणाले.२५ प्रकारच्या स्फोटकांचा शोध घेणाऱ्या भारतीय बनावटीच्या ओआरएक्स रिव्हेलेटरचे अनावरणडीआरडीओ आणि एचईएमआरएलच्या शास्त्रज्ञांनी अतिउच्च दर्जाची स्फोटके बनविण्यासाठी ‘ओआरएक्स रिव्हेलेटर’ ही यंत्रणा तयार केली आहे. याद्वारे २५ वेगवेगळ्या स्फोटकांचा शोध घेतला जाऊ शकतो. विमानतळ, बसस्थानक तसेच आदी ठिकाणी याचा प्रभावी वापर करता येणार आहे. तसेच मोठी घटना होण्याआधीच ती थोपविणे शक्य होणार आहे. या यंत्रणेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.दहशतवाद हा सुरक्षा यंत्रणेसमोरील मोठा प्रश्न आहे. अत्याधुनिक स्फोटकांचा आज मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ही स्फोटके शोधण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. विमानतळ, बसस्थानक, प्रवासी जहाजे, तसेच मोठे कंटेनर या ठिकाणी स्फोटके तपासण्यासाठी अतिउच्च दर्जाची यंत्रणा आवश्यक असते. या कार्यशाळेत यावर चर्चा होईल आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील.- डॉ. पी. के. मेहता, प्रमुख,आर्मड अ‍ॅन्ड कॉबेक्ट इंजिनिअरिंगभारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारताचे शेजारी हे मैत्रीपूर्ण नाहीत. यामुळे देशाला आर्थिक प्रगती साधताना अनेक अडथळे येतात. देशात अशांतता पसरविण्यासाठी अनेक घटक कार्यरत आहेत. त्यात दहशतवादी आघाडीवर आहेत. प्लॅस्टिक बॉम्ब, पेट्रोकेमिकल्ससारख्या स्फोटकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे त्यांचा शोध घेण्याची प्रभावी यंत्रणा हवी. या कार्यशाळेत सुरक्षा यंत्रणा, शास्त्रज्ञ, तसेच प्रशासकीय यंत्रणा यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. के. पी. एस. मूर्ती, डायरेक्टर, एचईएमआरएल

टॅग्स :ISISइसिसterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद