शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

‘इफ्फी’त यंदा दहा मराठी चित्रपट

By admin | Updated: October 11, 2016 03:50 IST

गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४७वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडिया) संपन्न होत

मुंबई : गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४७वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडिया) संपन्न होत आहे. या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे १० मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या वर्षीपासून मराठी चित्रपट पाठविण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरविली. गेल्या वर्षी २० ते ३० नोव्हेंबर २०१५ या कालावधीत पणजी येथे पार पडलेल्या ४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ९ मराठी चित्रपटांची राज्य शासनातर्फे निवड करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्केटिंग करण्यासाठी महाराष्ट्रातून मराठी चित्रपट पाठविणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले. या महोत्सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांनी तसेच चित्रपट रसिकांनी हे चित्रपट पाहिले. त्यामुळे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचण्यास मदत झाली.यंदा याच धर्तीवर गोवा येथे होणाऱ्या ४७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी १० चित्रपट निवडण्यात आले आहेत. यात कट्यार काळजात घुसली, नटसम्राट-असा नट होणे नाही, सैराट, हलाल, कोती, सहा गुण, बर्नी, डबल सीट, हाफ तिकीट आणि दगडी चाळ या चित्रपटांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरिता प्राप्त झालेल्या २७ चित्रपटांचे परीक्षण केल्यानंतर शासनाने नेमलेल्या समितीने १० मराठी चित्रपटांची निवड केली. मराठी चित्रपटांमधील कलाकृतीला दर्जेदार आणि उत्तम व्यासपीठ मिळावे या दृष्टिकोनातून गेल्या वर्षीपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट पाठविण्यास प्रारंभ झाला. कान्स येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही ३ मराठी चित्रपट राज्य सरकारच्या वतीने पाठविण्यात आले होते. (प्रतिनिधी)