शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सेनेसोबत युती केली तर एबी फॉर्म रद्द करू

By admin | Updated: January 26, 2017 02:37 IST

जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष भाजपा शिवसेनेशी युती करणार नाही, पण स्थानिक पातळीवर जर कोणी युती केली

मुंबई : जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष भाजपा शिवसेनेशी युती करणार नाही, पण स्थानिक पातळीवर जर कोणी युती केली, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा निर्णय पक्षाने घेतल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.राष्ट्रवादीच्या पार्लमेंटरी बोर्डाची बुधवारी मुंबईत बैठक झाली. तटकरे म्हणाले, जातीयवादी पक्षांच्या विरोधात हा निर्णय आम्ही घेतला असून, काँग्रेसनेही त्याचे पालन करेल, अशी आपल्याला अपेक्षा आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस शिवसेनेसोबत हातमिळवणी करत आहे, तुम्ही काय करणार, असे विचारले असता, तटकरे म्हणाले, आम्ही आमचा निर्णय जाहीर केला आहे. एवढेच नाही, तर एबी फॉर्म दिल्यानंतर जर कोणी अशी युती केली, तर सदर एबी फॉर्म रद्द समजावा, असे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पक्षातर्फे पाठवले जाईल. एवढी कठोर भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे जातीयवादी पक्षासोबत कोण हातमिळवणी करत आहे हे देखील राज्यातल्या जनतेला कळेल असेही तटकरे म्हणाले.पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी भाजपाला मदत करत आहे, असे विधान केले आहे, त्याबद्दल काय? असे विचारले असता, चव्हाण यांच्याच कामगिरीमुळे आज दोन्ही काँग्रेसवर ही वेळ आली आहे. त्या वेळी त्यांनी केलेली खेळी भाजपाच्या फायद्याची ठरली, हे सगळ्यांना माहिती आहे. ते एक व्यक्ती आहेत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी जर तशी भूमिका घेतली, तर आम्ही त्यावर पक्ष म्हणून आमची भूमिका मांडू. अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची जाहीर भूमिका घेतली आहे, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)