शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खुमखुमी असेल तर खुशाल स्वबळावर लढा - पतंगराव कदम

By admin | Updated: June 18, 2014 10:09 IST

खुमखुमी असेल, तर खुशाल स्वबळावर लढा, असा टोला वनमंत्री पतंगराव कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीला लगावला.

सांगली : लोकसभा निवडणुकीतील अनुभव घेऊन आता विधानसभा निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागेल. आघाडी करायची की स्वबळावर लढायचे, हा निर्णय ‘हायकमांड’ घेईल. तरीसुद्धा वारंवार हा मुद्दा उपस्थित होत आहे. खुमखुमी असेल, तर खुशाल स्वबळावर लढा, असा टोला वनमंत्री पतंगराव कदम यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीला लगावला. ते म्हणाले की, मोदी लाटेमध्ये काय घडले, ते आपल्यासमोर आहे. या गोष्टीचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकांवर होईल, असे वाटत नाही. तरीसुद्धा ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागेल. ‘हायकमांड’च्या निर्णयापूर्वीच स्वबळाचा मुद्दा रेटणे बरोबर नाही. एवढीच खुमखुमी असेल, तर ते आपसात लढतील. आघाडीचा निर्णय होऊनही जर स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली, तर त्यांना पुढील २५ वर्षे घरी बसावे लागेल. केंद्र व राज्य शासनाच्या योजना आम्ही लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकलो नाही. महागाई व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांचा मोठा गवगवा झाला. त्यामुळे लहान मुले, युवक व घरांतील महिलाही ‘अब की बार मोदी सरकार’चा नारा देत होत्या. आता राज्यातील निवडणुकांसाठी सतर्क राहायला हवे. उमेदवारीबाबतचे निर्णय स्थानिक पातळीवर घेऊन आम्ही थेट अंतिम यादीच ‘हायकमांड’ला देणार आहोत. त्यासाठीची तयारी आता सुरू केली आहे. प्रत्येक मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते, नागरिकांशी चर्चा केली जाईल. त्यातून नावांची प्राथमिक यादी व नंतर अंतिम यादी तयार केली जाईल. राज्यात नेतृत्व बदलून आता फारसे काही करण्यासारखे राहिले नाही, तरीही विधानसभा निवडणुकीपूर्वी काहीही होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)