शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

...तर पठाणकोट आणि उरी झाले नसते : डॉ. राजेंद्र निंभोरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 11:52 AM

भारतीय सेना शक्तीशाली आहे, हे दाखविण्याची वेळ आली आहे..

ठळक मुद्देसमस्त हिंदू आघाडीतर्फे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा भारतातील केवळ १५ लोकांनाच या हल्ल्याची पूर्वकल्पना

पुणे : भारतीय सेना शक्तीशाली आहे, हे दाखविण्याची वेळ आली आहे. सेनेवर भारतवासियांनी विश्वास ठेवल्यास सैन्याला बळ मिळेल. मुंबई हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाले असते तर उरी व पठाणकोट हल्ले झाले नसते. स्ट्राईकने आपल्यावरील हल्ले पूर्णपणे थांबतीलच असे नाही. मात्र, आपली सेना शक्तीशाली आहे, हे दिसेल, असे मत सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी केले.समस्त हिंदू आघाडीतर्फे शिवप्रताप दिन बाजीराव रस्त्याजवळील नातूबाग मैदान येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात ‘हिंदवी स्वराज्यभूषण वीर जीवा महाले’ पुरस्काराने राजेंद्र्र निंभोरकर यांना गौरविण्यात आले. तसेच ‘हिंदुत्व शौर्य’ पुरस्काराने संजय शर्मा यांना आणि मुकेश पाटील, सचिन पाटील यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, मिलिंद एकबोटे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, अ‍ॅड. मोहन डोंगरे, दीपक नागपुरे,तेजेंद्र कोंढरे, योगेश समेळ, संदीप महाराज पळसे, मनोज पवार, कृष्णाजी पाटील, संजय जढर, सचिन जामगे आदी उपस्थित होते. राजेंद्र निंभोरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा काळोख्या रात्री हल्ले करुन गड-किल्ले मिळविले. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकमध्ये देखील अमावस्येची किंवा काळोखी रात्र हीच आम्हा सैनिकांची मैत्रीण असते. भारतातील केवळ १५ लोकांनाच या हल्ल्याची पूर्वकल्पना होती. भारत सरकारने सैन्याला पूर्ण मुभा व साहित्य दिल्याने आम्ही सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करु शकलो, असे सांगताना त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे इतरही अनुभव सांगितले.पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले, भारतात इतिहासाचे लेखन नीट केले गेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० झाली. मात्र, राष्ट्र म्हणून आज ओळख मिळू लागली आहे. काश्मिरमध्ये ३७०, ३५अ कलम काढल्यानंतर खºया अर्थाने देश एकत्र झाला. यापूर्वी देश एकत्रितपणे उभा राहिला असता, तर काश्मिरी हिंदू पंडितावर अन्याय झाला नसता. मोहन शेटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आपण करताना अयोध्या आंदोलनाला यश येऊन राम मंदिर निर्माण होणार याचा आनंद यंदाच्या शिवप्रताप दिनाच्या उत्सवात आहे. मात्र, प्रतापगडच्या पायथ्याशी आजही अफजलखानाची कबर आहे. त्यामुळे आता ही कबर काढून शिवप्रताप स्मारक उभारण्याकरीता आपण पुढे येऊ या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर रंगराव पाटील व सहकाºयांनी पोवाडा सादर केला. तर, तुकाराम चिंचणीकर यांनी शिवरायांची आरती सादर केली. सौरभ कर्डे यांनी अफजलखान वधाचा प्रसंग सांगितला. नंदकिशोर एकबोटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Puneपुणेsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद