शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

"जर माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता!"; धनंजय मुंडे प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया  

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 15, 2021 1:46 PM

धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरचे आहे.

पुणे: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा हे गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याचे मत व्यक्त करत पक्षप्रमुख म्हणून यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका जाहीर केली आहे. भाजप मात्र मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिकेत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

आमदार रोहित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पवार म्हणाले,  धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरचे आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता काही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. परंतु तरीदेखील हे प्रकरण बदनामी आणि ब्लॅकमेलिंग संबंधी असल्याची माहिती समोर येत आहे.मात्र या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी अगोदरपासूनच सर्व सत्य परिस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवली आहे. जर हा माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता असे म्हणत एकप्रकारे धनंजय मुंडे यांचे समर्थन देखील रोहित पवार यांनी यावेळी केले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री व प्रवक्ते नवाब मलिक यांनी याआधीच मुंडे यांच्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. 

राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंना तूर्तास दिलासा... राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप व त्यांचा राजीनामा यावर महत्वाची चर्चा करण्यात आली. या कोअर कमिटीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत मात्र तूर्तास तरी मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला रेणू शर्मा यांनी भाजप व मनसेचे नेते यांच्यांशी पण संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पोलिस रेणू शर्मा व मुंडेंचा जबाब नोंदविणार आहेत.त्यामुळे एकूणच हा प्रकार संशयास्पद असल्याने राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत तूर्तास राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :BaramatiबारामतीElectionनिवडणूकRohit Pawarरोहित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेPoliticsराजकारणPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेस