देणगीदार न मिळाल्यास रांगेतील दाम्पत्याला मुख्य पूजेचा मान

By Admin | Updated: March 2, 2015 01:28 IST2015-03-02T01:28:37+5:302015-03-02T01:28:37+5:30

देणगीदार उपलब्ध नसेल, त्या दिवशी दर्शन रांगेतील एका भाविक दाम्प्त्याला विठ्ठलाच्या नित्यपूजेचा मान मिळणार आहे

If the donor does not get the donor, then the queen of the queue will be the main worshiper | देणगीदार न मिळाल्यास रांगेतील दाम्पत्याला मुख्य पूजेचा मान

देणगीदार न मिळाल्यास रांगेतील दाम्पत्याला मुख्य पूजेचा मान

पंढरपूर : देणगीदार उपलब्ध नसेल, त्या दिवशी दर्शन रांगेतील एका भाविक दाम्प्त्याला विठ्ठलाच्या नित्यपूजेचा मान मिळणार आहे. ही पूजा त्यांच्याकडून मोफत करून घेण्यात येणार आहे. मंदिर समितीने रविवारच्या बैठकीत हा निर्णय घेतला.
मंदिराचे उत्पन्न वाढविण्यासाठी यापूर्वी मोफत असलेल्या नित्यपूजेला ५१ हजार रुपये घेऊन भाविकांकडून नित्यपूजा करण्याचा निर्णय विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.
देणगीदाराबरोबरच देणगीदार नसलेल्या, पण रांगेत असलेल्या दाम्पत्यालाही पूजेचा मान द्यायचा, या निर्णयावरून वादंगही निर्माण झाले होते. मात्र या निर्णयावर मंदिर समिती ठाम राहिली आहे.
रविवारी झालेल्या बैठकीत मंदिर समितीतर्फे ३0 लाख रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: If the donor does not get the donor, then the queen of the queue will be the main worshiper