शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने बनवाबनवी केली तर अण्णांच्या पाठीशी - बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 06:07 IST

Anna Hajare News : केंद्र सरकारने बनवाबनवी केली तर अण्णांच्या आंदोलनाच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहू, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राळेगण येथे दिली.

पारनेर : केंद्र सरकारने बनवाबनवी केली तर अण्णांच्या आंदोलनाच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहू, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राळेगण येथे दिली.

बच्चू कडू यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे जाऊन एक तास राज्यातील शेती प्रश्नांविषयी हजारे यांच्याशी चर्चा केली.  मंत्री कडू म्हणाले, मंत्री झाल्यावर अण्णांची भेट झाली नव्हती. अण्णांना भेटल्यावर ऊर्जा मिळते. अधिक चांगले काम करता येते. राज्यातील शेती प्रश्नांवर अण्णांबरोबर मी चर्चा केली.  पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यातील खिनखिनी गावात रोहयो योजनेंतर्गत पेरणी ते काढणीपर्यंतचा शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा एक वेगळा प्रयोग राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अण्णांचे मार्गदर्शन घेतले.

हजारे म्हणाले, समाजासाठी चांगले काम करणारी जी काही माणसे आहेत, त्यात बच्चू कडू आहेत. माझ्या साध्या पत्राचीही दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारने केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांना राळेगणसिद्धीत पाठविले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इतर मागण्यांची पूर्तता होण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. थोडा विश्वास ठेवावा लागतो. चर्चेतून प्रश्न मार्गी लागतात, यावर माझा विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूanna hazareअण्णा हजारे