शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 20:30 IST

Badlapur Case Akshay Shinde Police Encounter, Nana Patole: "बदलापूरच्या त्या शाळेत लहान मुलींचे पॉर्न व्हिडीओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे," असा दावा यावेळी पटोलेंनी केला.

Badlapur Case Akshay Shinde Police Encounter, Nana Patole: बदलापूर शालेय मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काउंटर केले. या प्रकरणात आरोपीचे कोणीही समर्थन केलेले नाही. विरोधी पक्षांनी या एन्काऊंटवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत. सरकार उत्तरे न देता विरोधकांवरच प्रश्न उपस्थित करत आहे. भाजपा सरकार पापी व खोटारडे असून स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलत आहे. अक्षय शिंदे सारखेच बदलापूर प्रकरणातील सर्व आरोपींचे एन्काऊंटर करा, तर विरोधक सरकारच्या पाठीशी उभे राहतील, असे खुले आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे सरकारला दिले.

"बदलापूरच्या त्या शाळेत लहान मुलींचे पॉर्न व्हिडीओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे. हे अत्यंत भयावह आहे. ती शाळा भाजपा, आरएसएसची असून शाळेतील कृत्ये लपवण्यासाठी व शाळेच्या संचालकांना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. साध्या पाकीटमारालाही पोलीस बेडी बांधून घेऊन जातात. मग अक्षय शिंदेला हातकड्या घातल्या नव्हत्या का? तो काय तुमचा जावई होता का? ज्या पोलिसाची रिव्हॉल्व्हर अक्षय शिंदेने घेतली ती लॉक नव्हती का? बदलापूर प्रकरणातील बाकीचे आरोपी अजून का पकडले गेले नाहीत? हे प्रश्न उपस्थित होतात. जे लोक या प्रकरणात आहेत त्या सर्वांना अक्षय शिंदे सारखीच शिक्षा द्या," अशी मागणी पटोले यांनी केली.

"केवळ बदलापुरातच अशी घटना घडली असे नाही, तर गृहमंत्र्यांचे शहर नागपुरातही अलिकडच्या काळात यापेक्षा भयानक घटना घडली आहे. राज्यात लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे," याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :badlapurबदलापूरNana Patoleनाना पटोलेDeathमृत्यूSchoolशाळाPoliceपोलिसEknath Shindeएकनाथ शिंदे