शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसी विश्वचषक; अंतिम क्रिकेट सामन्यावर १० हजार कोटींच्या सट्ट्याचा अंदाज

By नरेश डोंगरे | Updated: March 7, 2026 19:52 IST

Nagpur : विश्वचषकासाठी टीम इंडिया फेवरेट; सट्टा बाजारातील रेट ओपन; ४२-४३ च्या रेटमुळे भारतीय संघाच्या विजयाचे संकेत; डी कंपनीसह अनेक बडे बुकी दुबईत

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रिकेट जगतासाठी महासंग्राम मानला जाणाऱ्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे रेट सट्टा बाजारात आज सायंकाळी खुले झाले. त्यानुसार, सट्टा बाजाराने भारताच्या विजयाचे संकेत देऊन 'टीम इंडिया ४२–४३' असा भाव दिला आहे. अर्थात भारत जिंकणार असा डाव लावणाऱ्या सट्टेबाजांना १ लाख रुपये लावल्यास बुकींकडून ४२ हजार रुपये मिळतील. तर, न्यूझिलंड जिंकणार असा दावा करणाऱ्या सट्टेबाजांना ४३ हजारांवर बुकींकडून १ लाख रुपये दिले जातील. या अंतिम सामन्यावर सुमारे १० हजार कोटींचा सट्टा लागेल, असा अंदाज बुकी बाजारातून वर्तविला जात आहे.

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत उत्कृष्ट कामगिरी करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

अंतिम सामन्याच्या पूर्व संध्येला सट्टा बाजाराने विश्व चषकाच्या फायनलसाठी टीम इंडियाला फेव्हरेट मानले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार टीम इंडियाचा ४२–४३ चा भाव आहे. ज्या संघाचा भाव कमी असतो, तो संघ विजयाचा सर्वात प्रबळ दावेदार मानला जातो. याचा अर्थ अंतिम सामन्यात भारताच्या विजयाची शक्यता जास्त आहे. सट्टा बाजारातील जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या वेळी देश-विदेशातील मोठे बुकी दुबईत एकत्र येतात. डी-कंपनी देखील मोठ्या क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजीवर बारकाईने लक्ष ठेवून असते. नागपूरसह भारतातील अनेक वॉन्टेड बुकी दुबईत बसून मोठे सट्टेबाजी नेटवर्क चालवत असल्याचे सांगितले जाते.

श्रद्धा अंधश्रद्धेवरही डाव

एकीकडे इंग्लंडला जेव्हा हरवले त्या त्यावेळी भारत वर्ल्ड कप जिंकतो हा सट्टा बाजारातील एक डाव आहे. तर, दुसरीकडे गुजरात अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेला सामना भारतीय संघ हरतो. त्यामुळे यावेळी भारतीय संघाची ड्रेसिंग रूम बदलल्याचे वृत्त आले आहे. सट्टा बाजारासाठी हा दुसरा डाव आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या झुल्यावर या दोन्ही डावात कोट्यवधीची खयवाडी-लगवाडी सुरू आहे.

बुकी बाजारातील चर्चा

भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यावर देशभरात सुमारे ८ ते १० हजार कोटी रुपयांचा सट्टा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय सट्टा बाजारात मध्य भारतातील अत्यंत महत्वाचे सेंटर म्हणून नागपूर (विदर्भ)चे नाव आहे. सबंधित वर्तुळाच्या चर्चेनुसार, रविवारच्या फायनलवर नागपूर-विदर्भातून एक हजार ते १२०० कोटींची खयवाडी-लगवाडी होणार आहे. नागपुरातील अनेक मोठे बुकी सध्या गोव्यातून खयवाडी-कटिंग करीत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : ICC World Cup Final: Estimated 10,000 Crore Betting Frenzy

Web Summary : The ICC T20 World Cup final sees a massive betting market open. India is favored, with an estimated 10,000 crore at stake. Nagpur emerges as a key betting hub, with bookies active in Goa and Dubai.
टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीWorld Cup Twenty20विश्वचषक ट्वेन्टी-२०nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र