आयसीसी विश्वचषक; अंतिम क्रिकेट सामन्यावर १० हजार कोटींच्या सट्ट्याचा अंदाज

By नरेश डोंगरे | Updated: March 7, 2026 19:52 IST2026-03-07T19:50:20+5:302026-03-07T19:52:31+5:30

Nagpur : विश्वचषकासाठी टीम इंडिया फेवरेट; सट्टा बाजारातील रेट ओपन; ४२-४३ च्या रेटमुळे भारतीय संघाच्या विजयाचे संकेत; डी कंपनीसह अनेक बडे बुकी दुबईत

ICC World Cup; Betting on the final cricket match is estimated to be worth Rs 10,000 crores | आयसीसी विश्वचषक; अंतिम क्रिकेट सामन्यावर १० हजार कोटींच्या सट्ट्याचा अंदाज

ICC World Cup; Betting on the final cricket match is estimated to be worth Rs 10,000 crores

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
क्रिकेट जगतासाठी महासंग्राम मानला जाणाऱ्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे रेट सट्टा बाजारात आज सायंकाळी खुले झाले. त्यानुसार, सट्टा बाजाराने भारताच्या विजयाचे संकेत देऊन 'टीम इंडिया ४२–४३' असा भाव दिला आहे. अर्थात भारत जिंकणार असा डाव लावणाऱ्या सट्टेबाजांना १ लाख रुपये लावल्यास बुकींकडून ४२ हजार रुपये मिळतील. तर, न्यूझिलंड जिंकणार असा दावा करणाऱ्या सट्टेबाजांना ४३ हजारांवर बुकींकडून १ लाख रुपये दिले जातील. या अंतिम सामन्यावर सुमारे १० हजार कोटींचा सट्टा लागेल, असा अंदाज बुकी बाजारातून वर्तविला जात आहे.

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत उत्कृष्ट कामगिरी करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

अंतिम सामन्याच्या पूर्व संध्येला सट्टा बाजाराने विश्व चषकाच्या फायनलसाठी टीम इंडियाला फेव्हरेट मानले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार टीम इंडियाचा ४२–४३ चा भाव आहे. ज्या संघाचा भाव कमी असतो, तो संघ विजयाचा सर्वात प्रबळ दावेदार मानला जातो. याचा अर्थ अंतिम सामन्यात भारताच्या विजयाची शक्यता जास्त आहे. सट्टा बाजारातील जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या वेळी देश-विदेशातील मोठे बुकी दुबईत एकत्र येतात. डी-कंपनी देखील मोठ्या क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजीवर बारकाईने लक्ष ठेवून असते. नागपूरसह भारतातील अनेक वॉन्टेड बुकी दुबईत बसून मोठे सट्टेबाजी नेटवर्क चालवत असल्याचे सांगितले जाते.

श्रद्धा अंधश्रद्धेवरही डाव

एकीकडे इंग्लंडला जेव्हा हरवले त्या त्यावेळी भारत वर्ल्ड कप जिंकतो हा सट्टा बाजारातील एक डाव आहे. तर, दुसरीकडे गुजरात अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेला सामना भारतीय संघ हरतो. त्यामुळे यावेळी भारतीय संघाची ड्रेसिंग रूम बदलल्याचे वृत्त आले आहे. सट्टा बाजारासाठी हा दुसरा डाव आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या झुल्यावर या दोन्ही डावात कोट्यवधीची खयवाडी-लगवाडी सुरू आहे.

बुकी बाजारातील चर्चा

भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यावर देशभरात सुमारे ८ ते १० हजार कोटी रुपयांचा सट्टा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय सट्टा बाजारात मध्य भारतातील अत्यंत महत्वाचे सेंटर म्हणून नागपूर (विदर्भ)चे नाव आहे. सबंधित वर्तुळाच्या चर्चेनुसार, रविवारच्या फायनलवर नागपूर-विदर्भातून एक हजार ते १२०० कोटींची खयवाडी-लगवाडी होणार आहे. नागपुरातील अनेक मोठे बुकी सध्या गोव्यातून खयवाडी-कटिंग करीत आहेत.
 

Web Title : आईसीसी विश्व कप फाइनल: 10,000 करोड़ रुपये के सट्टे का अनुमान

Web Summary : आईसीसी टी20 विश्व कप फाइनल में सट्टा बाजार खुला। भारत पसंदीदा, लगभग 10,000 करोड़ रुपये दांव पर। नागपुर सट्टेबाजी का केंद्र, बुकी गोवा और दुबई में सक्रिय।

Web Title : ICC World Cup Final: Estimated 10,000 Crore Betting Frenzy

Web Summary : The ICC T20 World Cup final sees a massive betting market open. India is favored, with an estimated 10,000 crore at stake. Nagpur emerges as a key betting hub, with bookies active in Goa and Dubai.