शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आईबाबांचे ऐकले नाही, तर जनतेचे काय ऐकणार? अजित पवारांचा सुजय विखेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 5:45 AM

पनवेलमध्ये शेकाप पदाधिकाऱ्यांचा मेळावा, शेकाप व राष्ट्रवादीची विचारधारा एकच

पनवेल : डॉ. सुजय विखेंच्याभाजपा प्रवेशाने काहीही फरक पडणार नाही. अनेक नेते पक्षामध्ये ये-जा करीत असतात. एक व्यक्ती महत्त्वाची नाही, तर त्याच्या मागे जनाधार महत्त्वाचा आहे. सुजय विखेने स्वत:च्या आईबाबांचे ऐकले नाही, तर जनतेचे काय ऐकणार? असा टोला अजित पवार यांनी सुजय विखेंना लगावला. बुधवारी पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शेकाप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.देशाच्या संरक्षण खात्याचा कारभार चालणाऱ्या संरक्षण मंत्रालयात पावलापावलावर चोख बंदोबस्त असतो. मी खासदार असताना या मंत्रालयाला स्वत: भेट दिली आहे, तेव्हा त्या ठिकाणचा बंदोबस्त पाहून राफेलची फाइल चोरी होतेच कशी, असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढविणार आहेत. पक्षाने अधिकृतरीत्या त्यांच्या नावाची घोषणा केली नसली, तरी पवार कुटुंबीयांच्या वारंवार पनवेल भेटीने हे सिद्ध झाले.मावळ लोकसभा मतदारसंघात सहा मतदारसंघांचा समावेश आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघ हा या सहापैकी सर्वांत मोठा असल्याने पार्थ पवार यांनीही पनवेलमधील शेकाप-काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवडाभरापासून पार्थ पवार पनवेलमध्ये मुक्काम ठोकून आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पनवेलमधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यासाठी शेकापची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यादृष्टीने अजित पवार यांनी उपस्थित शेकाप पदाधिकाºयांना कानमंत्र दिला. समोरील प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नका. विरोधकांचा पराभव करण्यासाठी जिद्दीने कामाला लागण्याची सूचना त्यांनी केली.शेकाप नेते व पवार कुटुंबीयांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. शेकाप व राष्ट्रवादीची विचारधारा एकच आहे. नोटाबंदीच्या काळात पैसे असताना अनेकांना त्याचा वापर करता आला नाही. रांगेत उभे राहून अनेकांना प्राण गमवावा लागला. जे सरकार महत्त्वाच्या फायलींचे संरक्षण करू शकत नाही, ते सर्वसामान्यांचे काय संरक्षण करेल? ही बाब सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असेही या वेळी पवार यांनी सांगितले. या मेळाव्याला कोकण शिक्षण मतदारसंघातील आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक हरेश केणी आदी उपस्थित होते.'भाजपाचे अपयश जनतेसमोर आणा'मागील आठवडाभरापासून पार्थ पवार शेकाप पदाधिकाºयांच्या भेटी घेत असल्याने पनवेलमधील काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरल्याचे वृत्त होते. अजित पवार यांनादेखील यासंदर्भात चाहूल लागताच त्यांनी पनवेलमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेस भवन गाठले. सुमारे दीड तास काँग्रेस पदाधिकाºयांना मार्गदर्शन करीत प्रचारात भाजपाचे अपयश जनतेसमोर आणा, असे सुचविले. या वेळी जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, महेंद्र घरत, सुदाम पाटील आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस