I will not leave the party. I will hold day-long huger strike in Aurangabad on 27 January, 2020 | पंकजा मुंडेंची 'वज्रमूठ'; 26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, 27ला लाक्षणिक उपोषण  

पंकजा मुंडेंची 'वज्रमूठ'; 26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, 27ला लाक्षणिक उपोषण  

परळीः गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडेंनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. पंकजा मुंडेंनी मंचावरून थेट नाव न घेता भाजपा नेतृत्वालाच इशारा दिला आहे. 26 जानेवारीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक वज्रमूठ तयार करणार असल्याचा निर्धारही त्यांनी केला आहे.

मी एक मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार असून, सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बनवू नका, असंही त्यांनी सांगितलं आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा आणि चांगला सधन शेतकरी तयार करण्यासाठी योगदान द्या, असं आवाहनच त्यांनी केलं आहे. 27 जानेवारीला औरंगाबादला मी लाक्षणिक उपोषण करणार असून, मराठवाड्याच्या पाण्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधणार असल्याचंही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवलं आहे. पाच वर्षांत जे केलं त्याला पुढे नेण्यासाठी या सरकारचं योगदान महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.


शांत बैठी हूं तो यह मत समझना, की आग नहीं हैं मेरे अंदर, डरती हूं कहीं समंदर कम न पड जायें., बुझाने के लिए, असं म्हणत त्यांनी स्वपक्षीयांनाच माझ्या शांत राहण्याचा गैरफायदा घेऊ नका, अशा प्रकारचा इशारा दिला आहे. 
मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, पण मला कोणतंही पद मिळू नये म्हणून कुणी प्रयत्न करतेय का? पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो, मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असं आवाहनच पंकजा मुंडेंनी भाजपा नेतृत्वाकडे केलं आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. जर पदाच्या हव्यासापायी आरोप होत असतील, तर मी कोअर कमिटीतून मुक्ती मागते, अशी आक्रमक भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली आहे. पंकजा मुंडेंनी नाव न घेता भाजपा नेतृत्वावर निशाणा साधला.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: I will not leave the party. I will hold day-long huger strike in Aurangabad on 27 January, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.