"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:05 IST2025-10-03T14:04:34+5:302025-10-03T14:05:08+5:30
"मी जे बोललो, ते त्यांनी (उद्धव ठाकरे) सत्य करून दाखवलं आणि माझे हजार रुपये वाचवले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देत, राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. "मी जे बोललो, ते त्यांनी (उद्धव ठाकरे) सत्य करून दाखवलं आणि माझे हजार रुपये वाचवले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते."
मुख्यमंत्री, फडणवीस म्हणाले, "मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरे यांनी माझे 1000 रुपये वाचवले. कारण मी आव्हान केले होते की, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासासंदर्भात एक तरी मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. काल, मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं, पण मी त्यांचं भाषण संपल्या बरोबर, जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना आणि काही पत्रकारांना विचराले की, बाबामला आता हजार रुपायंचा फटका आहे का? उद्धव ठाकरे काही तरी विकासावर बोलले का? अख्या भाषणात ते विकासासंदर्भात एक मुद्दाही बोलले नाहीत. बोलूच शकत नाहीत."
"ते (उद्धव ठाकरे) केवळ अद्वा-तद्वा बोलतात. खरं म्हणजे, त्यांचं बोलणं हे स्वगत असतं. कारण पुढे माणसंही नव्हते. यावेळेस तर अशी परिस्थिती होती की, पुढे माणसंही नव्हती. त्यामुळे त्यांचं स्वगत होतं. पण तरीही त्यांचे आभार मानतो की, त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार? राज्याला पुढे कसं नेणार? बीएमसीला पुढे कसं नेणार? यासंदर्भात अवाक्षरही न काढता, मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं आणि माझे हजार रुपये वाचवले. त्याबद्दल आभार," असा चिमटाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.