शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

"अशोक खरातच्या कृत्यात माझा कोणताही सहभाग नाही; ३९ आमदार भेटले, मग माझेच नाव का येते?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 23:52 IST

ज्या महिलावर अत्याचार झाला त्यांना न्याय मिळवून देण्याची आमची भूमिका आहे असं दीपक केसरकरांनी सांगितले.

शिर्डी - मी शिवभक्त आहे. दरवेळी शिर्डीला आलो की कुठल्यातरी महादेव मंदिरात जायचे म्हणून शिर्डीच्या वाटेवर असलेल्या ईशान्यश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी मी जात होतो.  त्यानिमित्ताने कॅप्टन अशोक खरात याच्याशी ओळख झाली. याशिवाय त्याच्या कोणत्याही कृत्यात माझा सहभाग नाही, असा खुलासा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना दिला. श्रीराम नवमीनिमित्त शिर्डी येथे केसरकर यांनी रात्री साई समाधीचे दर्शन घेतले.  त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

पुढे ते म्हणाले, कॅप्टन खरात याला वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल तर ते चुकीचे आहे, परंतु असा कुठलाही प्रयत्न माझ्याकडून झालेला नाही, त्यामुळे मी दोषी असण्याचा प्रश्नच नाही. जे कृत्य झालेला आहे त्याची शिक्षा खरातला झाली पाहिजे हीच माझी भूमिका आहे. न्यायालय त्याला शिक्षा देईल अशी माझी खात्री आहे. मंत्री असताना माझ्याबरोबर पोलीस असायचे. मात्र पोलिसांनाही याची कल्पना नव्हती. खरा त्याच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल मला कोणतेही माहिती नव्हती.  ईशानेश्वरच्या भक्ती पोटी खरात याच्याशी माझी ओळख झाली. ज्या महिलावर अत्याचार झाला त्यांना न्याय मिळवून देण्याची आमची भूमिका आहे. मी फक्त मंदिरात शिवलिंगाची पूजा केली आहे. याव्यतिरिक्त कोणतीही पूजा तिथे केली नाही. जवळ जवळ ३९ आमदार त्याला भेटून गेले, परंतु माझेच नाव समोर का येते हा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रातील ज्योतिष कलेची खरात ने बदनामी केली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kesarkar denies involvement in Kharat's acts; questions selective targeting.

Web Summary : Deepak Kesarkar denies involvement with Ashok Kharat's crimes, citing temple acquaintance. He condemns the crime, supports justice for the victim, and questions why he's singled out, despite others visiting Kharat.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातDeepak Kesarkarदीपक केसरकर