शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

मी माफी मागतो..!! पीयूष गोयल यांची कबुली; प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत केले होते विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 15:12 IST

Piyush Goyal clarification on NCP National President Praful Patel: अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

Piyush Goyal clarification on NCP National President Praful Patel: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे विधान एका मुलाखतीत केले होते. मात्र, पीयुष गोयल यांचा हा दावा प्रफुल्ल पटेलांनी फेटाळल्यानंतर पीयूष गोयल यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे.

"एका ज्येष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली की श्री. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांना काही विधाने केली, परंतु नंतर मला कळले की ती माहिती चुकीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी माफी मागतो," असे ट्विट करत पीयूष गोयल यांनी स्पष्टीकरण दिले.

पीयूष गोयल काय म्हणाले होते?

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलताना म्हटले होते, "एनसीपीचे नेतृत्व आता सुनेत्रा पवार यांच्याकडे असून प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे." या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. कारण अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्व अधिकृतपणे कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण

पीयूष गोयल यांच्या विधानानंतर निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली. "राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही तत्त्वांवर चालणारा पक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी, आमदारांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तसेच आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, अशा बाबींमध्ये आम्ही विहित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करतो," असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय पेच

२८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाशी विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशा संवेदनशील वेळी पियुष गोयल यांनी पटेल यांच्या नियुक्तीचे विधान केल्याने महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे की काही पडद्यामागच्या हालचाली सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Piyush Goyal Apologizes for Misinformation Regarding Praful Patel's NCP Role

Web Summary : Piyush Goyal apologized for incorrectly stating Praful Patel was appointed NCP's National President. He cited misinformation from a journalist. Patel refuted the claim, clarifying the party follows due process for leadership decisions after Ajit Pawar's death, creating political uncertainty.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPraful Patelप्रफुल्ल पटेलAjit Pawarअजित पवारpiyush goyalपीयुष गोयल