शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधून निवडून आलेलो याचा मला गर्व, शंका नसावी; अशोक चव्हाणांचे राज्यसभेत वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 17:15 IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलण्यासाठी अशोक चव्हाण उभे राहिले होते. यावेळी धनखड यांनी चव्हाणांचा बायोडेटा सांगितला.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात राज्यसभेमध्ये जागा मिळविणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आज महत्वाचे वक्तव्य केले आहे. 

तसे केंद्रात नवीन नसलेल्या अशोक चव्हाणांची ओळख राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड सभागृहाला करून देत होते. यावेळी धनखड यांनी चव्हाणांचा आजवरचा राजकीय प्रवास सभागृहाला सांगितला. दोनवेळा मुख्यमंत्री, दोनदा लोकसभा सदस्य, ४ वेळा आमदार, विधान परिषद सदस्य असे धनखड म्हणाले. यावेळी विरोधकांनी ते काँग्रेसमधून झालेले आहेत, भाजपातून नाही असे धनखड यांना उद्देशून म्हटले. यावर चव्हाण यांनी लगेचच आपली प्रतिक्रिया दिली. 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलण्यासाठी अशोक चव्हाण उभे राहिले होते. यावेळी धनखड यांनी चव्हाणांचा बायोडेटा सांगितला. यावर चव्हाण म्हणाले की, सभापती जी मी तुमचा आभारी आहे. तुम्ही संक्षिप्तमध्ये माझा बायोडेटा सांगितला. काँग्रेसमधून मी निवडून आलो याचा मला गर्व आहे. यात कोणतीही शंका नाहीय, असे ते म्हणाले. 

पिता पूत्र चारही सभागृहांचे सदस्य, वेगळाच विक्रम...

काँग्रेस सोडल्यानंतर अशोक चव्हाणांनी भाजपात येण्याचा निर्णय घेतला नसता तर पाच वर्ष विरोधात राहिलो असतो. दिल्लीत आमचे विरोधी पक्षांचे सरकार येण्याचा प्रश्नच नव्हता. मग काय करायचे? विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो, असे वक्तव्य केले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावे एक आगळा विक्रम नोंदविला गेला आहे.  ‘चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले पिता-पुत्र’ असा अनोखा विक्रम आता त्यांच्या नावे आहे. शंकरराव चव्हाण हे दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण हे एकदा मुख्यमंत्री होते. वडील आणि मुलगा अशा दोघांनीही मुख्यमंत्रिपद भूषविल्याचे हे अनोखे उदाहरण आहे. शंकरराव चव्हाण मुंबई प्रांतासह पाच वेळा विधानसभेचे सदस्य होते. एकदा ते विधान परिषदेचे सदस्य राहिले. दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले. तीन वेळा ते राज्यसभेचे खासदार होते.  

 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस