शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

मला आव्हाने स्वीकारण्यास आवडतात

By admin | Updated: June 29, 2016 03:38 IST

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मी खूप उत्साहित असून, या दौऱ्यात उपकर्णधार म्हणून माझ्यावर कोणताही दबाव नाही.

मुंबई : आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मी खूप उत्साहित असून, या दौऱ्यात उपकर्णधार म्हणून माझ्यावर कोणताही दबाव नाही. मला आव्हान स्वीकारण्यास आवडतं आणि त्यामुळे ही माझ्यासाठी नवी संधी आहे, असा आत्मविश्वास भारताचा उपकर्णधार आणि भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने व्यक्त केले. शालेय शिक्षणाच्या प्रसारासाठी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान रहाणेने आपल्या तयारीविषयी सांगितले. विंडीज दौऱ्याविषयी रहाणे म्हणाला की, ‘‘हा माझा दुसरा विंडीज दौरा असून, याआधी मी भारत ‘अ’ संघातून तेथे खेळलो होतो. मात्र आता सिनियर संघातून विंडीज दौऱ्यावर जात असून, मी पूर्णपणे सज्ज आहे. या दौऱ्यासाठी खडतर सराव केला आहे. हा दौरा निश्चित आव्हानात्मक आहे; कारण विंडीज संघ कडवी टक्कर देण्याची क्षमता राखून आहे.’’उपकर्णधारपदाच्या जबाबदारीविषयी रहाणे म्हणाला, ‘‘या दौऱ्यासाठी मला उपकर्णधार म्हणून खूप चांगली जबाबदारी मिळाली आहे. मला आव्हानाला सामोरे जाऊन जबाबदारी पूर्ण करायला आवडते. उपकर्णधार म्हणून माझ्यावर कोणताही दबाव नाही. गतवर्षीचा झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये मी कर्णधार म्हणून खूप काही शिकलो.’’त्याचप्रमाणे, ‘‘प्रत्येक दौरा आव्हानात्मक असतो. प्रत्येक देशात वेगवेगळे आव्हान असते. या सर्वांना सामोरे जाऊन तुम्ही कसे यशस्वी होता, हे महत्त्वाचे असते. उच्च स्तरावर जाण्यासाठी प्रत्येक आव्हान पेलण्याची क्षमता राखून ठेवणे गरजेचे असते,’’ असेही रहाणेने या वेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)>माझे वडील सुपरहिरो...शालेय शिक्षणाच्या प्रसारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी रहाणेला ‘तुझा आवडता सुपरहिरो कोण?’ असा प्रश्न केला. यावर रहाणे म्हणाला, ‘‘माझे वडील माझे आवडते सुपरहिरो आहेत. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले असून, त्यांच्यामुळे मी शिक्षण पूर्ण करू शकतो. खेळासोबतच शिक्षणही खूप महत्त्वाचं असतं हे मला त्यांनी शिकवलं.’’या वेळी विद्यार्थ्यांनी रहाणेला तुझे आवडते विषय कोणते होते? असाही प्रश्न केला. यावर रहाणेने, ‘इतिहास आणि गणित माझे आवडते विषय होते. मी गणितात ठीकठाक होतो, पण इतिहास खूप आवडायचा. मला विविध विषयांवरील पुस्तकेही वाचायला आवडतात,’ असे सांगितले. तसेच शाळेत मी नेहमी फर्स्ट बेंचर होतो, असेही रहाणेने आवर्जून सांगितले.