शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे सिंचन योजना अडल्या

By admin | Updated: December 21, 2014 00:20 IST

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विदर्भावर झालेल्या अन्यायाचे पडसाद उमटत असतानाच विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अहवालात यालाच दुजोरा देणारे सत्य मांडण्यात आले आहे.

१५७ टीएमसी पाण्याचा वापर नाही : वैधानिक विकास मंडळाचा अहवालनागपूर: विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विदर्भावर झालेल्या अन्यायाचे पडसाद उमटत असतानाच विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अहवालात यालाच दुजोरा देणारे सत्य मांडण्यात आले आहे. या अहवालानुसार या भागातील १५० सिंचन योजना विविध कारणांमुळे अडल्या असून विदर्भाच्या वाट्याला येणारे १५७ टीएमसी (ट्रिलियन मीटर क्युसेक) पाणीही वापरले जात नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.ही आहेत कारणेसिंचन प्रकल्प दुर्लक्षित राहण्यामागे अधिकाऱ्यांची रिक्त पदे हे प्रमुख कारण अहवालात नमूद करण्यात आले आहे. विदर्भ सिंचन विकास महामंडळात शाखा अभियंता आणि उपअभियंता यांची ५७९ पदे (३० टक्के) रिक्त आहेत. वन कायद्याचाही फटका या योजनांना बसला आहे.अनुशेष वाढतोयविदर्भाचा अनुशेष सातत्याने वाढत आहे. दांडेकर समितीच्या अहवालानुसार १९८२ मध्ये विदर्भाचा सिंचन अनुशेष ५,२७,३१० हेक्टर होता. अनुशेष व निर्देशांक समितीच्या अहवालानुसार १९९४ मध्ये तो ७,९४,७०० हेक्टर गेला आणि २०११ मध्ये तो ११,६१,६९० हेक्टरवर गेला. एकट्या अमरावती विभागात २,२७,२६९ हेक्टरचा सिंचन अनुशेष आहे. ४,२६,८९३ कृषी पंपांचा अनुशेषविदर्भात ४,२६,८९३ कृषी पंपाचा अनुशेष आहे. या पंपांना वीज पुरवठा झाला असता तर सहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली असती. राज्याच्या एकूण वीज निर्मितीपैकी ६१.३७ टक्के विदर्भात होत असली तरी प्रती हेक्टर वीज वापर कमी आहे. नागपूर विभागात प्रती हेक्टर वीज वापर ४१९ युनिट तर अमरावती विभागात ७०१ युनिट आहे. त्या तुलनेत अन्य भागात तो १ हजार युनिट आहे. २३९.७० कोटींची वसुली १२१.०३ कोटींचा खर्चजल कराच्या माध्यमातून जमा महसुलातून सिंचन योजनांच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च होणे अपेक्षित आहे. परंतु असे झाले नाही. विदर्भातून २०१०-११ आणि २०१२-१३ या दरम्यान एकूण २३९.७९ कोटी रुपये जल कर वसूल झाला.पण देखभाल दुरुस्तीवर १२१.०३ कोटी रुपये खर्च झाले.केळकर समितीचा अहवाल मंगळवारीराज्य सरकार मंगळवारी डॉ. विजय केळकर समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करण्याची शक्यता आहे. निधीचे समन्याय वाटप आणि अनुशेष यासंदर्भात या अहवालात शिफारशी करण्यात आल्या आहेत. या अहवालावर चर्चा करण्यास राज्य सरकार अनुकूल आहे. गत आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालाचे सादरीकरण केले होते. पण अहवाल सार्वजनिक केला नव्हता. (प्रतिनिधी)