शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:01 IST

Sindhudurg Crime News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या नांदोस गावातील घनदाट जंगलांमध्ये एक मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंवरून मृत व्यक्तीबाबतची माहिती समोर आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या नांदोस गावातील घनदाट जंगलांमध्ये एक मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. जंगली प्राण्यांनी या मृतदेहाचे लचके तोडल्याने मृतदेहाचे काही अवशेषच उरले असून, या सांगाड्याच्या अवतीभवती सापडलेला एक मोबाईल आणि अन्य वस्तूंच्याद्वारे पोलिसांनी माहिती काढली असता हा मृतदेह मालवणमधील कट्टा येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी तरुणाचा असल्याचे समोर आले आहे. तसेच या मृत तरुणाच्या भावानेही या वस्तूंची ओळख पटवली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मालवण तालुक्यातील नांदोस सुतारवाडीच्या जवळील जंगलमय भागात आज सकाळी हा पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. या भागात सडलेल्या मृतदेहामुळे दुर्गंधी पसरली आहे. या मृतदेहाच्या शरीराचे काही भाग जंगली प्राण्यांनी खाल्ल्याने या मृतदेहाचा सांगाडा शिल्लक राहिला आहे. हा मृतदेह सापडला, त्या ठिकाणाजवळ असलेल्या एका झाडाला एक साधी दोरी लटकलेली असल्याचे आढळून आले. त्याशिवाय निळ्या काळसर रंगाची ट्रॅक पॅन्ट आहे. तसेच बाजूला पांढऱ्या रंगाची चप्पल व टीशर्ट पडलेले आहे. एक बॅग आणि मोबाईल अशा वस्तू आढळून आल्या.

दरम्यान, ग्रामस्थांनी याबाबत मालवण पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाला सुरुवात केली. हा मृतदेह २० ते २५ दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंवरून पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह एका नेपाळी तरुणाचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या मृत तरुणाच्या भावाने घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंची ओळख पटवली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे नांदोस गावातील याच डोंगरात सुमारे २२ वर्षांपूर्वी पैशाचा पाऊस पडतो, असे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी आणून दहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शनिवारी याच डोंगरात मृतदेह सापडल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. तसेच जुन्या घटनेची आठवणही जागी झाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग