भिवंडीत पुन्हा अग्नितांडव ; शहरातील नारायण कंपाऊंड परिसरात मोती कारखान्याला भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 11:23 PM2021-05-29T23:23:17+5:302021-05-29T23:24:06+5:30

शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली घटना. अग्नीशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण

A huge fire broke out at a factory in the Narayan compound area bhiwandi city fire in control | भिवंडीत पुन्हा अग्नितांडव ; शहरातील नारायण कंपाऊंड परिसरात मोती कारखान्याला भीषण आग 

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव ; शहरातील नारायण कंपाऊंड परिसरात मोती कारखान्याला भीषण आग 

Next
ठळक मुद्देशनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली घटना.अग्नीशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण

भिवंडीभिवंडीतआग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतांनाच शहरातील नारायण कंपाउंड येथे असलेल्या एका मोती कारखान्याला शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोती कारखाना जाळून खाक झाला आहे. दरम्यान घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत दोन तासांच्या अथक प्रयत्नात आगीवर नियंत्रण मिळविले आहे. 

सध्या या ठिकाणी कुलींगचे काम अग्निशमन दलाच्या वतीने सुरु आहे. विशेष म्हणजे हा मोती कारखाना नागरी वस्तीत दाटीवाटीच्या परिसरात असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. 

भिवंडीत मोती कारख्यांनासह यंत्रमाग कारखाने , गोदामे , तसेच डाइंग व सायजिंग यांना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र महापालिका व पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचे देखील या आगींकडे पुरता दुर्लक्ष होत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे. 
 

Web Title: A huge fire broke out at a factory in the Narayan compound area bhiwandi city fire in control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.