शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:59 IST

Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh's Murder: हे आता आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात गेले ना, यामुळे यांच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आता, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला...

Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh: संतोष देशमुख यांच्या खुनाचा बदला होणार. राहिलेल्यांनाही अटक करायची आहे. ती लढाईपण आता सुरू होणार आहे. महादेव मुंडे खुनाचे काय झाले? गिते नावाचे आहेत, त्यांच्यासंदर्भात काय झाले? असे सवाल करत, पुढे बघा आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. हे आता आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात गेले ना, यामुळे आता यांच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत, असा थेट इशाराही मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते एका खासगी रुग्णालयातून पत्रकारांसी बोलत होते. 

धनंजय मुंडे म्हणतात, मला काही लोकांनी अडचणीत आणलं. पण बहिणीने सावरलं, तासंतास सोबत बसून आधार दिला..., असे विचारले असता जरांगे म्हणाले, "तो त्यांचा घरगुती प्रश्न आहे. त्याच्याशी आपल्याला काय करायचे. साथ द्या नका देऊ. पण खुनाचा बदला होणार. संतोष देशमुखांचा जो खून केला, त्याला फाशी होणार. राहिलेल्यांनाही अटक करायची आहे. ती लढाईपण आता सुरू होणार आहे. महादेव मुंडे यांच्या प्रकरणाची लढाईही पुन्हा नव्याने सुरू होणार."

...आता त्यासंदर्भातही मोठे आंदोलन नव्याने सुरू होणार -

जरांगे म्हणाले, "मी सरकारला गेल्या पाच-सात दिवसांत यासंदर्भात बोललो आहे की, महादेव मुंडे खुनाचे काय झाले? गिते नावाचे आहेत, त्यांच्यासंदर्भात काय झाले? आज मी माध्यमांना सांगत आहे. तसेच संतोष देशमुख प्रकरणातील जे फरार आरोपी आहेत, त्यांच्या अटकेचे काय झाले? त्यांच्यावरील मोकोका कशामुळे उठवला? यासंदर्भातही आपण सरकारसोबत बोललो आहोत. कारण त्यासंदर्भातही खूप मोठे आंदोलन आता पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. असेही जरांगे यांनी  यावेळी स्पष्ट केले. 

...यामुळे यांच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आता -जरांगे पुढे म्हणाले, महादेव मुंडे प्रकरणात केवळ दिखाऊपणा केला. संतोष देशमुख यांचे आरोप पकडण्यातही दिखाऊपणा केला. पुढे बघा आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. हे आता आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात गेले ना, यामुळे यांच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आता, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेMaratha Reservationमराठा आरक्षणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या