शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये पोलीस भरती कशी पार पडणार? विद्यार्थी,पालक संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 19:07 IST

राज्याच्या गृहमंत्र्यांनी येत्या डिसेंबर अखेर जवळपास १२ हजार ५३८ पदांची भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे.

ठळक मुद्देमंत्रालयात गृह विभागांच्या अधिकाºयांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस भरतीचा निर्णय

प्रशांत ननवरेबारामती : राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. शासनाने या काळात संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, याच दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येत्या डिसेंबर अखेर महाराष्ट्रात जवळपास १२ हजार ५३८ पदांची भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे. आता वाढत्या कोरोना संसर्गाच्या वातावरणात पोलीस भरती प्रक्रिया नेमकी पार कशी पडणार,याबाबत विद्यार्थी आणि पालक वर्गात संभ्रम आहे. 

मंत्रालयात गृह विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या प्रमाणात पोलीस भरती जाहीर झाल्यामुळे व त्याचा कालावधी खूप कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील मुले ,मुली पोलीस भरतीच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०१९मध्ये पोलीस शिपाई भरती, पोलीस वाहन चालक भरती व राज्य राखीव पोलीस दल भरतीच्या एकूण ५ हजार २९७ पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरलेलेआहेत. यात नव्याने पदांची वाढ झाल्यामुळे एका बाजुला उमेदवार व पालक यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर दुसऱ्या बाजुला ही भरतीप्रक्रिया कशी राबवली जाईल?, याबाबत प्रचंड संभ्रम आहे.    

वास्तविक १८ जानेवारी २०१९ रोजी गृह विभागाने काढलेल्या शासन आदेशानुसार सुरुवातीला १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे . ही लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन घेतली जाणार आहे. या लेखी परीक्षेत पात्र होणाऱ्या उमेदवारांमधून एकास दहाप्रमाणात उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले जाणार आहे. यामधील मैदानी चाचणी १०० गुणांवरून ५० गुणांची करण्यात आली आहे.यामध्ये मुलांसाठी १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळा फेक या तीन प्रकारांचा समावेश आहे, तर मुलींसाठी ८०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळा फेक या तीनप्रकारांचा समावेश आहे. या शासन निर्णयाला पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांनी प्रचंड विरोध केला. लेखी परीक्षा ही ऑफलाईन झाली पाहिजे तसेच मैदानी चाचणी ही १०० गुणांची झाली पाहिजे,अशा मागण्यांची निवेदने संबंधित लोकप्रतिनिधींना व शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली.                    

याबाबत बारामती येथील सह्याद्री करिअर अ‍ॅकडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, एवढ्या मोठ्या जागांची भरती जाहीर केल्याबद्दल शासनाचे सर्व विद्यार्थी आभार व्यक्त करत आहेत. पण ही भरती प्रक्रिया नेमकी कशी राबवणार? हे सरकारने अगोदर परिपत्रक काढून जाहीर करावे, तसेच कोरोना महामारीच्या काळात ही भरती प्रक्रिया राबविली जात असल्याने मैदानावर सराव करावा तर पोलीस प्रतिबंध करतात आणि अभ्यासिकेत अभ्यास करावा तर महाराष्ट्रातील सर्व अभ्यासिका कोरोनामुळे बंद आहेत . त्यातच पोलीस भरती येत्या डिसेंबरच्या आत सरकारने जाहीर केल्याने खूप कमी कालावधी उमेदवारांच्या हातामध्ये शिल्लक राहिला आहे. 

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसState Governmentराज्य सरकारAnil Deshmukhअनिल देशमुखCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस