शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

...तर मग संजय राऊत यांच्या पोटात दुखले नाही तर कसे चालेल ? प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 18:59 IST

अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधता आला तर आला, असा त्यांचा प्रयत्न आहे.

पिंपरी : अण्णा हजारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देत त्यांच्यावर विश्वास ठेवून केंद्र सरकारविरोधातील आंदोलन स्थगित केले. असे असताना संजय राऊत यांच्या पोटात दुखले नाही तर कसे चालेल, असा प्रश्न उपस्थित करून प्रवीण दरेकर यांनी राऊत यांच्यावर तोफ डागली आहे. 

प्रवीण दरेकर यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवड शहराला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे भाजप नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली.  हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. त्यानंतर ‘सामना’तून अण्णा यांच्या या भूमिकेवर तिरकस भाष्य करण्यात आले. याबाबत दरेकर म्हणाले, अण्णांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन आंदोलन मागे घेतले. त्यामुळे राऊतांच्या पोटात दुखले नाही तर कसे चालेल? अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधता आला तर आला, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या दुर्दैवाने हा स्वार्थ साधता येत नाही. त्यामुळे ‘सामना’च्या अग्रलेखातून कुठल्यातरी निमित्ताने टिका केली जाते. 

शिवसेनेने ‘संभाजीनगर’बाबत कृती करावीशिवसेनेच्या करणी आणि कथणीत फरक आहे. संभाजीनगरच्या बाबतीत आम्ही काही तडजोड करणार नाही, असे सांगतात. मग महापालिकेत त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेत ठराव करावा कॅबिनेटचा निर्णय घ्या, केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता लागल्यास आम्ही पुढाकार घेऊ. केवळ जाहीर करणे, घोषणा करणे यापेक्षा कृतीची आवश्यकता आहे. संभाजीनगर, असे नामकरणाची कृती करून दाखवावी, असे म्हणून प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर टिका केली.

डॉ. तात्याराव लहाने यांनी चार भिंतीत बोलावेभाजप सरकारच्या काळात त्रास झाला, असे वक्तव्य डाॅ. तात्याराव लहाने यांनी केले. त्याबाबत प्रवीण दरेकर म्हणाले, त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. राजकारणात सत्ताधारी किंवा विरोधक जाहीररित्या एकमेकांची उणीदुणी काढतात. त्याप्रमाणे प्रशासनातील, सरकारमधील उणीदुणी बाहेर काढणे शोभा देणारे नाही. अशाप्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. लहाने यांनी चार भिंतींच्या आत बोलायला पाहिजे. लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSanjay Rautसंजय राऊतPraveen Darekarप्रवीण दरेकरPoliticsराजकारणanna hazareअण्णा हजारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस