शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माणसात फूट पाडणारे विकास कसा करणार?

By admin | Updated: October 10, 2014 03:01 IST

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या निर्मितीतून तमाम मराठी मने एकत्र जोडली. शिवसेनेच्या मुळात मराठी माणसाचे साम्राज्य उभे केले.

कल्याण : स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या निर्मितीतून तमाम मराठी मने एकत्र जोडली. शिवसेनेच्या मुळात मराठी माणसाचे साम्राज्य उभे केले. पण, त्यांच्या हयातीतच दोन भावंडांच्या सत्तेच्या भांडणात मराठी माणूस दुभंगला. ते राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास कसा साधणार, असा सवाल केंद्रीय परराष्ट्रमंत्री, भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी येथे केला.गेली २५ वर्षे महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती होती. या निवडणुकीत ही युती होऊ शकली नाही. भाजपा, भाजपा नेते आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहाचे संबंध लक्षात घेता शिवसेनेवर टीका करणार नाही, असे धोरण भाजपाने जाहीर केले़ पण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली मर्यादा सोडून बोलत आहेत, वागत आहेत, असेही त्या ठाकरे यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख न करता म्हणाल्या.यशवंतराव चव्हाण मैदानात १२ वाजता सभेची वेळ जाहीर केली होती. परंतु, त्यांच्या हेलिकॉप्टरला दोन तास उशीर झाला. महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर अत्यंत कडक शब्दांत टीका करून स्वराज पुढे म्हणाल्या, पूर्वी जो महाराष्ट्र विकसित होता, इतर राज्ये त्याच्याकडे कौतुकाने पाहत़ मात्र, त्याच महाराष्ट्रात आघाडीच्या काळात शेतकरी, पोलीस आत्महत्या करीत आहेत, ही चिंतेची बाब आहे. भ्रष्टाचाराने तर महाराष्ट्रात कळस गाठला आहे. औद्योगिक क्षेत्रात पीछेहाट झाली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे महाराष्ट्राचेच आहेत. तरीही महाराष्ट्रातील कृषीचा दर घटत आहे. परदेशांतून विकासासाठी साहाय्य आले, पण ते महाराष्ट्रात आलेच नाही, अशी अत्यंत कडवट टीका त्यांनी या वेळी तळपत्या उन्हातही केली. (वार्ताहर)