शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार हे सदस्यच नाहीत तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कसे? अजित पवार गटाचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 07:20 IST

NCP MLA disqualification Case: राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही. शरद पवारांसह प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेता झाली. घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा जोरदार युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी बुधवारी केला. 

मुंबई - राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही. शरद पवारांसह प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेता झाली. घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा जोरदार युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी बुधवारी केला. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतचेची सुनावणीही पूर्ण झाली आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देणार, याचीच आता उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १५ फेब्रुवारीआधीच हा निकाल येण्याची शक्यता आहे.

दोन्ही गटांच्या आमदारांची झाली उलटतपासणीशरद पवार गटातील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची, तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरे, अनिल पाटील यांची उलटतपासणी झाली. शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा युक्तिवाद ॲड. शरण जगतियानी यांनी केल्यानंतर बुधवारी अजित पवार गटाच्या ॲड. प्रदीप संचेती यांनी पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.4

दोन्ही गटांकडून केले दावे-प्रतिदावेसरकारमध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही निर्णयासाठी मंत्रिमंडळासमोर जावे लागते. एक व्यक्ती मी अध्यक्ष आहे, मीच निर्णय घेऊ शकतो, असे म्हणू शकत नाही.- ॲड. प्रदीप संचेती, (अजित पवार)अजित पवार गटाच्या वकिलांनी पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थच बदलून टाकला. यात राजकीय पक्षाला बगल देता येणार नाही तसेच पक्ष काेणता हे प्रथमदर्शनी ठरवावे लागणार आहे.-ॲड. जगतियानी, (शरद पवार) 

लेखी म्हणणे मांडण्याचे नार्वेकरांचे आदेश- राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद संपल्यानंतर सभापती राहुल नार्वेकर यांनी त्यांना शुक्रवारपर्यंत (दि. २) सायंकाळी ५ वाजेपर्यंत लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश  दिले. - नार्वेकर यांनी दोन्ही गटांना त्यांच्या निवेदनातील १) राष्ट्रवादीची संघटनात्मक रचना काय असते? २) ती रचना सांगितल्यानंतर त्यात बहुमत कोणाला आहे? हे दोन मुद्दे स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभाRahul Narvekarराहुल नार्वेकर