महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 09:15 IST2025-09-01T09:15:06+5:302025-09-01T09:15:29+5:30
महाराष्ट्रात शिक्षण हा आता समान संधीचा हक्क न राहता खर्चाची शर्यत ठरू लागला आहे.

महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रात शिक्षण हा आता समान संधीचा हक्क न राहता खर्चाची शर्यत ठरू लागला आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या (NSS) ८०व्या फेरीत करण्यात आलेल्या व्यापक मॉड्युलर शिक्षण सर्वेक्षणानुसार, सरकारीशाळांत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च केवळ ३,००० रुपये इतका आहे. पण, पालकांनी जर मुलांना खासगी विनाअनुदानित शाळेत घातले तर त्याच विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी त्यांना तब्बल २८ हजार ७४१ रुपये मोजावे लागतात.
महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च?
- कोर्स फी: ११,५७६
- वाहतूक: ६,४४०
- वह्या, पुस्तके: २,१३२
- युनिफॉर्म: १,५४५
- इतर: ९३४
असमानतेची दरी
- शैक्षणिक शुल्कातील तफावत हा असमानतेचा ठळक पुरावा आहे.
- सरकारीशाळा : खर्च कमी, पण दर्जा व सुविधा मर्यादित.
- अनुदानित शाळा : खर्च मध्यम, तरीही सरकारी शाळांपेक्षा पाचपट.
- खासगी शाळा : उच्च फी, वाहतूक, युनिफॉर्म, इन्फ्रास्ट्रक्चर, पालकांचा खिसा मात्र रिकामा.
महाराष्ट्रात शाळानिहाय सरासरी वार्षिक खर्च
- सरकारी शाळा: ३,०००
- अनुदानित शाळा: १५,४०६
- खा. विनाअनुदानित शाळा: २८,७४१
- इतर शाळा: १४,६४४
- सर्व गैर-सरकारी (एकत्रित): २५,०६०
- सर्व प्रकार (एकूण सरासरी): १३,०५१