शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सांगा शिकायचे तरी कसे ? ५७ टक्के शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:48 IST

एकीकडे सर्व शिक्षा अभियानासारख्या विविध उपक्रमांतर्गत समाजाच्या तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

मुंबई : एकीकडे सर्व शिक्षा अभियानासारख्या विविध उपक्रमांतर्गत समाजाच्या तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे राज्यभरात कमी पटसंख्या असलेल्या आणि गुणवत्ता नसलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यातच शिक्षक हक्क कायद्यांतर्गत सुरू असलेल्या शाळांमध्येच सरकार नियमांचे पालन करत नसल्याचे उघड झाले आहे. ५७ टक्के शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नसल्याचे बाल हक्क अभियानाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. पूर्णवेळ मुख्याध्यापकांअभावी कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यामुळे सांगा कसे शिकायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील अनेक शाळांमध्ये गरजू, वंचित बालकांना शिक्षण दिले जाते. पण शाळांमध्ये सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक जण खासगी शाळांकडे वळत आहेत. बाल हक्क अभियानातर्फे ८ जिल्ह्यांतील पहिली ती आठवीच्या १२२ शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात मुंबईतील ८ महापालिकेच्या शाळा सोडता अन्य सर्व शाळा या जिल्हा परिषदेच्या होत्या.ज्या शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही, अशा शाळांची गुणवत्ता कशी सुधारणार, असा प्रश्न बाल हक्क अभियानातर्फे उपस्थित करण्यात आला आहे.शिक्षक, विद्यार्थीच करतात शौचालयांची स्वच्छता-या सर्वेक्षणात आढळून आलेली एक चांगली बाब म्हणजे शाळांमध्ये शौचालय बांधणी झाली आहे अथवा शौचालय बांधणीचे काम सुरू आहे. पण दुसरीकडे असे दिसून आले की, ६९ टक्के शाळांमध्ये शौचालयाची स्वच्छता ही शिक्षक अथवा विद्यार्थीच करतात, तर फक्त १२ टक्के शाळांमध्ये शौचालयाची स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी आहेत. ६३ टक्के शाळांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी कोणतीही सोय नाही, तर ३४ टक्के शाळांमध्ये मुलांना खेळायला मैदान उपलब्ध नाही.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी