रुग्णालये बनली दुकाने - हायकोर्ट

By Admin | Updated: June 14, 2014 04:42 IST2014-06-14T04:42:11+5:302014-06-14T04:42:11+5:30

सध्या रुग्णालये ही दुकानाप्रमाणे काम करीत आहेत, असे खडेबोल शुक्रवारी उच्च न्यायालयाने शासनाला सुनावले. यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे़

Hospitals built - High Court | रुग्णालये बनली दुकाने - हायकोर्ट

रुग्णालये बनली दुकाने - हायकोर्ट

मुंबई : सध्या रुग्णालये ही दुकानाप्रमाणे काम करीत आहेत, असे खडेबोल शुक्रवारी उच्च न्यायालयाने शासनाला सुनावले. यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे़
या प्रकरणी संजय प्रजापती यांनी याचिका केली आहे़ संजय यांचा भाऊ चिंकूला अपघात झाला होता व त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती़ त्यामुळे त्याच्यावर सेव्हन हिल्स् रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली़ त्यानंतर रुग्णालयाच्या बिलावरून संजय व रुग्णालय प्रशासनामध्ये वाद झाला़ मुळात ज्या डॉक्टरच्या उपचाराचे पैसे आकारण्यात आले ते डॉक्टर त्या वेळी सुट्टीवर होते़ तसेच हे बिल अधिक असल्याचा दावा प्रजापती यांनी केला़ तर बिल न भरल्याने रुग्णालयाने चिंकूला डिस्चार्ज देण्यास नकार दिला़ त्याविरोधात संजय यांनी न्यायालयात धाव घेतली़ न्या़ व्ही़एम़ कानडे व न्या़ प्रमादे कोदे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली़ त्यात सेव्हन हिल्स् रुग्णालयाने चिंकूला डिस्चार्ज दिला जाईल, असे स्पष्ट केले़ मात्र या सर्व प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Hospitals built - High Court