शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांना व्याज माफ होणार!

By admin | Updated: July 25, 2014 00:20 IST

सुधारित पत्रक : शेतकर्‍यांना दिलासा

खामगाव : गत फेब्रुवारी व मार्च महिन्यातील गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील डिसेंबर २0१४ पर्यंतचे व्याज माफ होणार आहे. शासनाने २२ मार्च रोजी काढलेल्या आदेशामध्ये, जे गारपीटग्रस्त शेतकरी ३0 जून २0१४ पर्यंत पीक कर्जाची परतफेड करतील, त्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी घेतलेल्या पीक कर्जाच्या परतफेडीच्या दिनांकापर्यंतचे व्याज शासनामार्फत संबंधित बँकेस अदा करण्यात येईल, असे नमूद केले होते. मात्र आदेश सुस्पष्ट नसल्याने बँका, तसेच शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानुसार ११ जुलै रोजी सुधारित शासन आदेश निर्गमित करण्यात आला. नव्या आदेशानुसार, जे गारपीटग्रस्त शेतकरी ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत पीक कर्जाची परतफेड करतील, अशा शेतकर्‍यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या दिनांकापर्यंतचे व्याज शासनामार्फत संबंधित बँकेस अदा करण्यात येणार आहे. त्याशिवाय ज्या शेतकर्‍यांनी पीक कर्जाची परतफेड मुदतीच्या आत केली असेल, त्यांना केंद्र शासनाकडील प्रोत्साहनात्मक व्याज सवलतीचा व राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभही मिळणार आहे. या लाभाची रक्कम पीक कर्जावरील व्याज रकमेमध्ये समायोजित केली जाणार आहे. मात्र यावर्षी पाऊस दोन महिने लांबला आहे. त्यामुळे पीक नियोजन कोलमडले आहे. आता येईल त्याच पिकाची पेरणी करावी लागेल. तर डिसेंबर पूर्वी पिक घरात आल्यासच शेतकर्‍यांच्या हाती पैसा येणार आहे.