शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावामुळे घोडबंदरकर हैराण

By admin | Updated: June 29, 2016 02:59 IST

महावितरणचे अघोषीत भारनियमन सुरु असतांनाच आता पावसाळ्यातही येथील अनेक भागांवर सतत जाणाऱ्या वीजेमुळे हैराण होण्याची वेळ आली आहे.


ठाणे : उन्हाळ्यात घोडबंदरच्या अनेक भागात महावितरणचे अघोषीत भारनियमन सुरु असतांनाच आता पावसाळ्यातही येथील अनेक भागांवर सतत जाणाऱ्या वीजेमुळे हैराण होण्याची वेळ आली आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ रात्री-अपरात्रीदेखील वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने येथील रहिवासी आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. येत्या दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर महाविरणविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
महावितरणने घोडबंदरच्या अनेक भागात, भूमीगत वाहिन्या टाकण्याचे काम अधर्वटच सोडले आहे. निधी नसल्याचे कारण पुढे करुन ते रखडल्याचे उत्तर महावितरणचे अधिकारी देत आहेत. त्यातच उन्हाळ्यात अघोषीत भारनियमनाने हैराण झाल्याने घोडबंदरकरांना आता पावसाळ्यातही वीजेच्या लंफडावाचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून घोडबंदरच्या मानपाडा, शिवाजी नगर, आझादनगरचा काही भाग, टिकुजिनीवाडीचा काही भाग, मनोरमानगर, गणेश नगर, दुर्गानगर, ब्रम्हांडचा काही भाग आदींसह डोंगरीपाडा, पातलीपाडा आदी भागांनाही वांरवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी अचानक रात्रीच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना मानपाडा, बुद्धविहार परिसरात घडली होती. या ठिकाणी नवीन वायर टाकण्याची मागणी करुनही महावितरण त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या तर, दिवसातून १० ते १५ वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यात रात्री, अपरात्रीदेखील तो खंडित झाल्याने येथील रहिवाशांचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे.
विशेष म्हणजे एखाद्या वेळेस वीजपुरवठा खंडित झाला तर त्याची तक्रार करण्यासाठी ढोकाळी येथील कार्यालयाला फोन केल्यास त्याठिकाणी एकही कर्मचारी फोन घेण्यासाठी हजर नसल्याचे दिसून आले आहे. तर काही वेळेस फोनच बाजूला ठेवला जात आहे. (प्रतिनिधी)
>या संदर्भात स्थानिक नगरसेवकांकडेदेखील तक्रार करुन त्यांच्याकडूनही दाद मिळत नसल्याचे येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. त्यात मंगळवारी सकाळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पुन्हा पाच मिनिटात सुरळीत सुरु झाला होता. परंतु, त्यानंतर पुन्हा तो खंडित झाला तो चार तासांनी सुरळीत झाला. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. परंतु, तसे न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.