भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 23:45 IST2025-10-11T23:45:21+5:302025-10-11T23:45:40+5:30
Pimpri Chinchwad Crime News: प्रेयसीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रियकराना चाकूने तिचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. वाकड येथील एका लॉजमध्ये शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
प्रेयसीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रियकराना चाकूने तिचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. वाकड येथील एका लॉजमध्ये शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
मृत तरुणीचं नाव मेरी तेलगू असं असून, ती डी-मार्टमध्ये काम करत होती. आरोपी प्रियकराचं नाव दिलावर सिंग असून, तो हॉटेल व्यवसायात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सहा वर्षांपूर्वी दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर हळूहळू ही ओळख मैत्री आणि प्रेमात बदलली होती.
१० ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस होता. दिलावरने तिचा वाढदिवस साजरा केला. परंतु नंतर या दोघांमध्ये वाद झाला. तसेच संशयाच्या आणि रागाच्या भरात दिलावरने वाढदिवसाचा केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूनेच मेरीवर वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर आरोपी दिलावर थेट कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात मेरी इतर एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचा संशय दिलावरला असल्याचं समोर आलं आहे.