शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

राज्यातील पोलिसांचा सन्मान; ५४ अधिकारी, अंमलदारांना पोलीस पदक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 5:30 AM

जासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाच्या वतीने कर्तबगार पोलिसांची नावे जाहीर करण्यात आली.

मुंबई : राज्य पोलीस दलात शौर्यपूर्ण, उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या ५४ अधिकारी, अंमलदारांना राष्टÑपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. राज्य राखीव दलाच्या प्रमुख अर्चना त्यागी, अप्पर महासंचालक (प्रशिक्षण व खास पथक) संजय सक्सेना, एटीएसमधील समन्वयक उपायुक्त धनंजय कुलकर्णी, खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन काब्दुले आदींचा यात समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाच्या वतीने कर्तबगार पोलिसांची नावे जाहीर करण्यात आली.

महाराष्टÑ पोलीस दलातील चौघांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्टÑपती पोलीस पदक तर अनुक्रमे ४० व १० जणांना गुणवत्तापूर्ण सेवा व शौर्यपूर्ण कार्याबद्दल गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबई, नवी मुंबईतील १० हून अधिक अधिकारी, अंमलदारांचा समावेश आहे.राष्टÑपती पोलीस पदक जाहीर झालेल्या अर्चना त्यागी या राज्य राखीव दलाच्या प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्या १९९३ च्या आयपीएस बॅचच्या अधिकारी असून, त्यांच्याच तुकडीतील व पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण व खास पथकाचे अप्पर महासंचालक संजय सक्सेना यांनाही या पदकाने सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

पदक घोषित झालेल्या अन्य अधिकारी, अंमलदारांची पदक, पदनिहाय नावे अशी :राष्टÑपती पोलीस पदक विशेष सेवा : साहाय्यक आयुक्त शशांक सांडभोर (वरळी विभाग) व साहाय्यक फौजदार वसंत साबळे (कोरेगाव पोलीस स्टेशन, सातारा).पोलीस शौर्यपदक : उपायुक्त समीरसिंग साळवे, अप्पर अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मिथुन जगदाळे, कॉन्स्टेबल सुरपत वड्डे, आशिष हालमी, विनोद राऊत, नंदकुमार आंग्रे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम, हामित डोंगरे.पोलीस पदक गुणवत्तापूर्ण सेवा : धनंजय कुलकर्णी (अधीक्षक समन्वयक, दहशतवाद विरोधी पथक), नंदकुमार ठाकूर (उपायुक्त, सशस्त्र विभाग, वरळी), अतुल पाटील (अप्पर आयुक्त, मोटर परिवहन, मुंबई), साहाय्यक आयुक्त स्टिवन अ‍ॅन्थोनी (एटीएस, मुंबई), नंदकिशोर मोरे (विशेष शाखा -१, मुंबई), निशिकांत भुजबळ (सिडको, औरंगाबाद), चंद्रशेखर सावंत (पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला), वरिष्ठ निरीक्षक गजानन काब्दुले (खार, मुंबई), मुकुंद पवार (विशेष शाखा-१, सीआयडी, मुंबई), निरीक्षक : मिलिंद टोटरे (एसीबी, नागपूर), सदानंद मानकर (वाचक शाखा, अकोला), संभाजी सावंत (प्रशिक्षण केंद्र, तुरुची, सांगली), केमोझ इराणी (गुप्त वार्ता विभाग, मुंबई), नीलिमा अराज (अमरावती), इंद्रजीत कराळे (गुप्तवार्ता विभाग, ठाणे), गौतम पाठारे (औरंगाबाद), सुभाष भुजंग (जालना), सुधीर दळवी (मालाड पोलीस ठाणे, मुंबई), किसन गायकवाड (तुर्भे वाहतूक नियंत्रण शाखा, नवी मुंबई), उपनिरीक्षक : जमील इस्माईल सय्यद (राखीव दल, औरंगाबाद मुख्यालय), मधुकर चौगुले (गगनबावडा, कोल्हापूर), साहाय्यक फौजदार : भीकन सोनार (जळगाव), राजू अवताडे (अकोला), शशिकांत लोखंडे (गुप्त वार्ता विभाग, मुंबई), हवालदार : अशपाकअली चिस्थिया (नक्षलविरोधी पथक, गडचिरोली), वसंत तराटे (एन.एम. जोशी मार्ग, मुंबई), रवींद्र नुल्ले (उजळाईवाडी वाहतूक चौकी, कोल्हापूर), महेबुबअली सय्यद (नाशिक पोलीस नियंत्रण कक्ष), साहेबराव राठोड (स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा), दशरथ चिंचकर (पुणे ग्रामीण), लक्ष्मण टेंभुर्णे (गडचिरोली), बट्टुलाल पांडे (नागपूर शहर), विष्णू गोसावी (नाशिक ग्रामीण), प्रदीप जांभळे (एटीएस, पुणे), चंद्रकांत पाटील (जळगाव), भानुदास जाधव (विशेष शाखा -१, मुंबई), नितीन मालप (राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई), रमेश शिंगटे (वाचक, उत्तर नियंत्रण कक्ष, मुंबई), बाबूराव बिºहाडे (राज्य गुप्त वार्ता विभाग, नाशिक) व संजय वायचळे (नाशिक शहर).

टॅग्स :Policeपोलिस