हनीच्या मृत्यूच्या अफवेने खळबळ

By Admin | Updated: June 3, 2014 00:50 IST2014-06-03T00:50:32+5:302014-06-03T00:50:32+5:30

सोशल मीडियावरील अफवाही किती गोंधळ माजवू शकतात, याचा अनुभव हनी सिंगला आला. हनी सिंगच्या मृत्यूची वार्ता सोशल मीडियावर वा:यासारखी पसरली.

Honey's death rumors | हनीच्या मृत्यूच्या अफवेने खळबळ

हनीच्या मृत्यूच्या अफवेने खळबळ

>सोशल मीडियावरील अफवाही किती गोंधळ माजवू शकतात, याचा अनुभव हनी सिंगला आला. हनी सिंगच्या मृत्यूची वार्ता सोशल मीडियावर वा:यासारखी पसरली. सोशल नेटवर्किग वेबसाईटवर हुबेहूब हनी सिंगसारख्या दिसणा:या एका तरुणाचे छायाचित्र टाकण्यात आले. हा तरुण हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत होता. या छायाचित्रखाली लिहिलेले होते की, प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंग यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ही वार्ता सोशल मीडियावर वा:यासारखी पसरली, वास्तविक हनी सिंग सध्या तो दुबईत आहे. 

Web Title: Honey's death rumors