हनीसिंग, बादशाहविरुद्ध अवमानना याचिका

By Admin | Updated: June 13, 2015 02:05 IST2015-06-13T02:05:14+5:302015-06-13T02:05:14+5:30

पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग उर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी. पी. सिंग ऊर्फ बादशाह यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

Honey Singh, a contempt petition against the king | हनीसिंग, बादशाहविरुद्ध अवमानना याचिका

हनीसिंग, बादशाहविरुद्ध अवमानना याचिका

नागपूर : पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग उर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी. पी. सिंग ऊर्फ बादशाह यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी शुक्रवारी याप्रकरणी राज्य शासनास दोन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
आनंदपालसिंग जब्बल असे याचिकाकर्त्याचे नाव असून त्यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व बादशाहविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाच्या एका आदेशाविरुद्ध दोन्ही गायकांनी उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल करून पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने वादग्रस्त आदेश रद्द केला होता. यानंतर दोघांनीही दुसऱ्यांदा पाचपावली पोलीस ठाण्यात हजेरी लावली पण, पोलिसांना आवाजाचे नमुने दिले नाहीत. ही कृती पोलिसांना असहकार्य करणारी असल्यामुळे
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना झाली असे जब्बल यांचे म्हणणे आहे.
दोन्ही गायकांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात दाखल केलेले अर्ज प्रलंबित आहेत. सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Web Title: Honey Singh, a contempt petition against the king