शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'मिसेस होम मिनिस्टर' यांचा फोन कॉल देतोय महाराष्ट्र पोलिसांच्या कुटुंबियांना मोलाचा 'आधार' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 14:19 IST

''हॅलो...मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी,'' असा फोन गेल्यावर पहिल्यांंदा त्यावर विश्वास बसत नाही.

ठळक मुद्देड्युटीवर असणाऱ्या राज्यातल्या 87 पोलिसांना आजवर कोरोनाने नेले काळाच्या पडद्याआड गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा कोरोना काळात राज्यात 28 जिल्ह्यात केला दौरा

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसदलाचा कुटूंबप्रमुख या नात्याने जास्तीत जास्त पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क ठेवण्याचे धोरण स्विकारले आहे. गृहमंत्र्यांच्या 'होम मिनिस्टर' असणाऱ्या त्यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी देखील याच पद्धतीने संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्या बोलतात ते पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पत्नींशी...होय, दररोज राज्यातल्या किमान वीस पोलिस पत्नींशी त्या संवाद साधतात.

''हॅलो...मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी,'' असा फोन गेल्यावर पहिल्यांंदा त्यावर विश्वास बसत नाही. गृहमंत्र्यांंच्याच पत्नी बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र पोलिस पत्नींच्या भावना अनावर होतात. आपुलकीने आणि वडीलधाऱ्याच्या मायेने आरती देशमुख बोलू लागतात तेव्हा संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्याची पत्नी भारावून जाते आणि फोन संपेपर्यंत आत्मविश्वासाने भरून जाते.    

कोरोनाच्या संकटाने ड्युटीवर असणाऱ्या राज्यातल्या 87 पोलिसांना आजवर कोरोनाने काळाच्या पडद्याआड नेले आहे. शेकडो पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे ड्युटीवर जाणाऱ्या घरातल्या कर्त्या माणसाबद्दल घरच्यांना काळजी लागून राहते. आरती देशमुख यांनी 'लोकमत'ला सांगितले, ''गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा कोरोना काळात राज्यात 28 जिल्ह्यात दौरा केला. शेकडो लोकांना ते भेटतात. रुग्णालयांमध्ये जातात. अशावेळी पत्नी म्हणून माझ्या मनातही सतत काळजी असते. त्यामुळेच ज्यांच्या घरातील माणूस ड्युटीवर आहे त्यांच्या मनात काय भावना येत असतील याची कल्पना मी करु शकते. यातूनच मला वाटलं की आपण पोलिसांच्या घरातल्या महिलांशी बोललं पाहिजे. त्यांना धीर दिला पाहिजे. याच भावनेतून मी रोज जास्तीत जास्त पोलिसांच्या घरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते.'' 

 माझा फोन गेल्यानंतर बहुतेक जणींच्या भावना अनावर होतात. त्यांना रडू कोसळते. ड्युटीवर असणाऱ्याबद्दलची काळजी त्या व्यक्त करतात. ड्युटीवरुन घरी आल्यानंतर त्यांना मुलाबाळांना देखील नीट जवळ घेता येत नाही. ड्युटीवर असताना कुठून संसर्ग होईल याची धास्ती त्यांना असते. आपल्यामुळे माझ्या घरच्यांना कोरोनाची लागण होऊ नये याचीही काळजी त्यांच्या मनात असते. कोरोनानं जीवनच बदलून गेल्याचे त्या सांगतात, असा अनुभव आरती देशमुख यांनी सांगितला. त्यावर मी त्यांना दिलासा देते. तुम्ही एकट्या नाहीत. सरकार, समाज तुमच्या पाठीशी आहे, हे सांगते. यातून त्यांची उमेद वाढते असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसFamilyपरिवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस