शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्डच्या नेमणुकांवर टाच!

By admin | Updated: December 5, 2014 03:38 IST

पोलिसांच्या मदतीसाठी गडचिरोली जिल्ह्णात व मुंबई शहरात होमगार्डच्या बारमाही नेमणुका केल्या जात होत्या. मात्र, नवीन सरकारने यावर १ डिसेंबरपासून प्रतिबंध घातला असून

दिगंबर जवादे, गडचिरोलीपोलिसांच्या मदतीसाठी गडचिरोली जिल्ह्णात व मुंबई शहरात होमगार्डच्या बारमाही नेमणुका केल्या जात होत्या. मात्र, नवीन सरकारने यावर १ डिसेंबरपासून प्रतिबंध घातला असून, आता इतर जिल्ह्णांप्रमाणेच महत्त्वाचे सण व परीक्षेच्या कालावधीतच या नेमणुका केल्या जाणार आहेत़ परिणामी होमगार्डस्वर बेराजगाराची कुऱ्हाड कोसळणार असून, पोलीस प्रशासनावरही कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे़ नक्षल चळवळीमुळे गडचिरोली अतिसंवदेनशिल जिल्हा म्हणून ओळखला जाते. पोलिसांना नक्षल अभियान राबविण्याबरोबरच गाव व शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीसुध्दा काम करावे लागते. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या तक्रारींचा निपटारा करणे व गुन्ह्णांचा शोध घेणे ही दैनंदिन कामेही करावीच लागतात. पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्याबरोबरच त्यांना मदत म्हणून जिल्ह्णात होमगार्डच्या बारमाही नेमणूका केल्या जात होत्या. २००५ पासून मुंबई शहर व गडचिरोली जिल्हा वगळता इतर जिल्ह्णांमध्ये होमगार्डच्या नेमणूका गणपती, नवरात्रोत्सव व परीक्षेच्या कालावधीतच केल्या जात होत्या. जिल्ह्णात एकूण ८०० होमगार्ड कार्यरत आहेत. होमगार्डला दररोज ४०० रूपये मानधन दिले जाते.बारमाही नेमणूका होत असल्याने त्यांच्या कुटुंबाला थोडीफार आर्थिक मदत होत होती. पोलीस दलालाही वेळोवेळी सहाय्य होत होते. मात्र एक महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या नवीन सरकारने प्रशासकीय खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने मुंबई शहर व गडचिरोली जिल्ह्णातील होमगार्डच्या बारमाही नेमणुकांवर टाच आणली आहे. इतर जिल्ह्णांप्रमाणेच होमगार्डची नेमणूक महत्त्वाचे सण, निवडणूक व परीक्षा कालावधीपुरतीच करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार १ डिसेंबर पासून नेमणूका बंद झाल्या आहेत. या नवीन आदेशामुळे होमगार्ड कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले असून, पोलीस दलालाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.