Holi 2022: “तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच”; भाजपचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 11:18 IST2022-03-17T11:17:09+5:302022-03-17T11:18:00+5:30

Holi 2022: होळीसंदर्भात ठाकरे सरकारने जारी केलेल्या गाइडलाइन्सवर भाजपने टीका केली आहे.

holi 2022 bjp ram kadam criticised on maharashtra govt guidelines for holi festival and dhulivandan celebration | Holi 2022: “तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच”; भाजपचा एल्गार

Holi 2022: “तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच”; भाजपचा एल्गार

मुंबई: मराठी महिन्यातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मोठा सण म्हणजे होळी. देशभरात होळी उत्साहात साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातही होळीचा रंग न्याराच असतो. मात्र, होळी आणि धुलिवंदन साजरे करण्यासंदर्भात राज्य सरकारने नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यावरून आता विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच, असे भाजपने स्पष्ट केले आहे. 

रात्री १० च्या आत होळी पेटवण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी डीजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने मार्गदर्शक नियमावलीत केली आहे. राज्यातील सर्व पोलीस स्टेशनना ही नियमावली पाठवण्यात आली असून, या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात राम कदम यांनी ट्विट करत होळी जल्लोषात साजरी करणार असल्याचे म्हटले आहे. 

आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच

महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना विरोध का? आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत.. आहो तुम्ही घाबरत असाल.. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच, असे ट्विट राम कदम यांनी केले आहे. 

हेही वाचा: होळी, धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी

दरम्यान, याला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले असून, विरोधी पक्षाने विरोध करु नये. विरोधासाठी विरोध करत लोकांचे जीव धोक्यात घालण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास ते तयार नाहीत. सत्ता येत नसल्याने वैफल्य येऊ शकतं, पण ते अशा टोकाला जाऊ नये की आपल्या राज्यात आपल्याच लोकांचे बळी जावेत आणि त्याचेही राजकारण करत सरकारला धारेवर धरता यावं हे चुकीचे आहे. इतके क्रूर पद्धतीचे, अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हते आणि करु नये, या शब्दांत पलटवार केला आहे. 
 

Web Title: holi 2022 bjp ram kadam criticised on maharashtra govt guidelines for holi festival and dhulivandan celebration