विमान अपघात तपासावर सभागृहात खुली चर्चा घ्या; आमदार सुनील शेळके यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:05 IST2026-03-13T12:01:30+5:302026-03-13T12:05:12+5:30

पुणे जिल्ह्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजितदादांचे नाव देण्याची मागणीही त्यांनी केली. 

Hold an open discussion in the House on the investigation into the plane crash; MLA Sunil Shelke demands | विमान अपघात तपासावर सभागृहात खुली चर्चा घ्या; आमदार सुनील शेळके यांची मागणी

विमान अपघात तपासावर सभागृहात खुली चर्चा घ्या; आमदार सुनील शेळके यांची मागणी

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेमागील सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावे, यासाठी या अपघात प्रकरणावर आणि तपास यंत्रणाकडून करण्यात आलेल्या तपासावर विधानसभेत खुली चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच पुणे जिल्ह्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजितदादांचे नाव देण्याची मागणीही त्यांनी केली. 

अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना शेळके म्हणाले की, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. 

याची हवी स्पष्टता

विमानाचे पायलट अचानक का बदलले गेले, टेकऑफची वेळ का बदलली, उशीर नेमका कशामुळे झाला आणि कमी दृश्यमानतेत लँडिंग करण्याचा प्रयत्न का करण्यात आला, याबाबत स्पष्टता येणे आवश्यक आहे. 

दादा गेले तरी...

अजितदादांच्या निधनानंतर काही मंडळी या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शेळके यांनी केला. पवार कुटुंबाच्या मागे अनेक नेते आणि कार्यकर्ते ठामपणे उभे राहिले असून आमची निष्ठा अजितदादांप्रती आणि त्यांच्या कुटुंबाप्रती कायम असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title : अजित पवार के विमान हादसे की खुली जांच की मांग।

Web Summary : विधायक सुनील शेल्के ने अजित पवार के विमान हादसे की सच्चाई सामने लाने के लिए विधानसभा में खुली चर्चा की मांग की। उन्होंने पुणे स्टेडियम का नाम पवार के नाम पर रखने का अनुरोध किया, घटना के जातिगत अर्थों को खारिज किया और पवार के परिवार के प्रति निष्ठा की पुष्टि की।

Web Title : Demand for Open Probe into Ajit Pawar's Plane Crash.

Web Summary : MLA Sunil Shelke demands open discussion in assembly regarding Ajit Pawar's plane crash investigation to reveal truth. He also requested that the Pune stadium be named after Pawar, dismissing caste-based interpretations of the incident and reaffirming loyalty to Pawar's family.